शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha Election 2024: ..अखेर निर्णय झाला; सांगलीत मराठा समाजाचा पाठिंबा कोणाला, जाणून घ्या

By संतोष भिसे | Updated: November 14, 2024 15:49 IST

मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी समाजाने पाडापाडीची भूमिका घ्यावी असे आवाहन केले आहे

सांगली : विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या कोणत्याही संघटनेने अथवा व्यक्तीने कोणत्याही उमेदवाराला मराठा समाज म्हणून पाठिंबा देऊ नये असा निर्णय सांगलीत समाजाच्या बैठकीत झाला. बैठकीला पद्माकर जगदाळे, नितीन चव्हाण, सतीश साखळकर, अतुल माने, शरद देशमुख आदी उपस्थित होते.मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी समाजाने पाडापाडीची भूमिका घ्यावी असे आवाहन केले आहे. त्यावर चर्चेसाठी गुरुवारी बैठक झाली. यावेळी पद्माकर जगदाळे म्हणाले, सर्वच पक्षांमध्ये व अपक्षांसोबत मराठा समाजबांधव कार्यरत आहेत. पण जरांगे -पाटील यांनी निवडणुकीचा विषय डोक्यातून काढला आहे. महाविकास आघाडी, महायुती किंवा अपक्ष यापैकी कोणालाही पाठबळ दिलेले नाही असे स्पष्ट केले आहे. समाजाने स्वतः विचार करून निर्णय घ्यावा असेही सांगितले आहे. सांगलीत म्हणून एखाद्या उमेदवाराला पाठिंबा देऊन समाजात फूट पडू नये अशी भूमिका आहे. त्यामुळेच समाज कोणालाही पाठिंबा देणार नाही.बैठकीला विजय साळुंखे, विजय पाटील, शिवाजी मोहिते, उदय जाधव, सच्चिदानंद कदम, विश्वजीत पाटील, प्रवीण पाटील, उदय पाटील, राहुल पाटील, ऋषिकेश पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी, ॲड. भाऊसाहेब पवार, राजेश जगदाळे, विकास सूर्यवंशी, उमेश चव्हाण, भरत कुबडगे, शिवप्रसाद पाटील यांच्यासह मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

स्वत:च्या इच्छेनुसार काम करापद्माकर जगदाळे म्हणाले, समाजातील विविध संघटना, कार्यकर्ते यांनी समाजाच्या नावाने कोणालाही पाठिंबा देऊ नये. समाजाचा नेता म्हणून प्रचारही करू नये. वैयक्तिक पातळीवर स्वइच्छेनुसार काम करावे, पण ती समाजाची भूमिका आहे असे सांगू नये. एखाद्याने समाजाच्या नावाने पाठिंबा जाहीर केला, तर तो निर्णय सकल मराठा समाजाला मान्य नसेल.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षणwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024