शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha Election 2024: जनतेचा नव्हे, तर..; खानापूर विधानसभेच्या निवडणुकीत मोठे षडयंत्र, वैभव पाटील यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 17:55 IST

'मीच मला मतदान केले आहे की नाही, असा प्रश्न'

दिलीप मोहिते विटा : लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली जनतेची मने विचलित करून महायुतीने ईव्हीएमला हाताशी धरून महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्याचे मोठे षडयंत्र रचले. तोच प्रयोग खानापूर मतदारसंघातही झाला असून या मतदारसंघातही तशाच प्रकारे मोठे षडयंत्र रचले. त्यामुळे ईव्हीएम हे यंत्र आहे की षडयंत्र? असा संतप्त सवाल उपस्थित करीत खानापूर मतदारसंघात झालेला विरोधी उमेदवाराचा विजय हा जनमताचा कौल नसून तो ईव्हीएम यंत्राचा कौल आहे, असे महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार अ‍ॅड. वैभव पाटील यांनी विटा येथील पत्रकार परिषदेत सांगत निवडणूक प्रक्रियेबाबतच शंका उपस्थित केली.वैभव पाटील म्हणाले, खानापूर मतदारसंघाचा निकाल पहाता यात मोठे षडयंत्र रचले गेले आहे. माझ्या विरोधातील निवडून आलेले उमेदवारच मी दोन ते पाच हजाराने निवडून येणार असे सांगत होते. तेच ७८ हजाराने निवडून येत आहेत. हे आश्चर्यकारक आहे. निवडणूकीच्या काळातील एकूण वातावरण, मला मिळत असलेला प्रतिसाद, सर्व प्रकारे लोकांतून होत असलेला उठाव याचा विचार केला तर या मताधिक्यामुळे मीच मला मतदान केले आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.भविष्यात या देशात लोकशाही जीवंत ठेवायची असेल तर मतदान बॅलेट पेपरवर घ्यायला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून खानापूरच्या निवडणूकीत अनेक जणांनी मला साथ दिली. मदत केली, पक्षानेही भरपूर सहकार्य केले. सर्व माझ्याबरोबरच असताना झालेला माझा पराभव हा ईव्हीएम यंत्राचा विजय म्हणावा लागेल. हा जनमताचा कौल नाही. तो ईव्हीएमचा कौल आहे. तो त्यांना मिळाला आहे. मात्र, या निकालाने जनतेचे प्रश्न सुटले की जनतेला प्रश्न पडले, असे मी या निकालाबाबत बोलताना म्हणत आहे.खानापूर मतदारसंघात निवडणूकीच्या सुरूवातीच्या काळात आमच्या जनशक्तीबरोबर धनशक्ती आहे, असे मला वाटत होते. परंतु, विरोधी उमेदवाराच्या धनशक्तीसोबत ईव्हीएम यंत्रही आहे. हे जनतेने पाहिले. परंतु, मी हरणारा वैभव पाटील नाही. पराभव झाला असला तरी कार्यकर्त्यांनी व जनतेनेही खचून जाऊ नये. हा विजय ईव्हीएम यंत्राचा झाला आहे. मी नव्या जोमाने पुन्हा उभा राहत आहे, असेही वैभव पाटील यावेळी म्हणाले.यंत्र म्हणून बघायचे की षडयंत्र राज्यात महाविकास आघाडीचे जे उमेदवार निवडून आले ते हजारपासून पंचवीस हजारापर्यंतच्या मतांनी आले. परंतु, महायुतीचे विजयी झालेले उमेदवार हे ४० हजारापासून लाखापर्यंतच्या मताधिक्यांनी आले. त्यामुळे निवडणूकीचा निकाल पहाता ईव्हीएमकडे यंत्र म्हणून बघायचे की षडयंत्र म्हणून बघायचे, असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024khanapur-acखानापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीEVM Machineईव्हीएम मशीन