शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्रीताई पाटील यांची अनामत रक्कम जप्त, सांगली जिल्ह्यात डिपॉजिट जप्त झालेले उमेदवार किती..वाचा

By अशोक डोंबाळे | Updated: November 25, 2024 18:24 IST

अनामत रक्कम कधी जप्त होते ?

सांगली : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांतील ९९ उमेदवारांपैकी केवळ सहा पराभूत उमेदवारांची अनामत वाचली आहे. उर्वरित काँग्रेसच्या जयश्री पाटील, भाजपचे तम्मनगौडा रवी पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेंद्र देशमुख या बंडखोर उमेदवारांची अनामत जप्त (डिपॉझिट) झाली. शासनाच्या खात्यामध्ये २० लाख ७५ हजार रुपयांची अनामत जमा होणार आहे.लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ नुसार, संसदीय किंवा विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे ठरावीक रक्कम जमा करणे बंधनकारक आहे. सर्वसाधारण मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारास विधानसभेला २५ हजार आणि आरक्षित मतदारसंघातून अर्ज दाखल करण्यासाठी १० हजार रुपयांची अनामत रक्कम निवडणूक आयोगाने ठरविली आहे.

उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर मतदारसंघात एकूण झालेल्या मताच्या एकषष्ठांश मते मिळणे गरजेचे आहे. उमेदवाराला तेवढी मते मिळाली नाही, तर त्याची अर्ज भरताना जमा केलेली अनामत रक्कम शासनाकडे जमा होते. या सूत्रानुसार जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांतील ८३ पराभूत उमेदवारांना साधारण ३४ ते ३५ हजार मते मिळणे गरजेचे आहे.

या उमेदवारांचे डिपॉझिट वाचले..सांगली विधानसभा मतदारसंघातील एकूण १४ उमेदवार रिंगणात उतरले होते. यापैकी काँग्रेसचे पराभूत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना ७६ हजार ३६३ मते मिळाल्यामुळे ते अनामत रक्कम वाचविण्यात यशस्वी झाले. पण, काँग्रेस बंडखोर जयश्रीताई मदन पाटील यांना ३२ हजार ६३६ मते मिळाल्यामुळे त्यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. या मतदारसंघातील उर्वरित ११ उमेदवारांचीही अनामत रक्कम जप्त झाली. खानापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे वैभव पाटील यांची अनामत रक्कम वाचली असून, बंडखोर माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्यासह १२ उमेदवारांची अनामत जप्त झाली. जत विधानसभा मतदारसंघातही लक्षवेधी लढत झाली असून, तेथेही भाजप बंडखोर तमन्नगोडा रवी पाटील यांना १९ हजार १२० मते मिळाल्यामुळे त्यांची अनामत जप्त झाली. अन्य आठ उमेदवारांचीही अनामत जप्त झाली आहे. आठ विधानसभा मतदारसंघांतील ८३ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाल्यामुळे २० लाख ७५ हजार रुपयांची रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा होणार आहे.

अनामत रक्कम कधी जप्त होते ?उमेदवाराला मतदारसंघातील एकूण वैध मतांच्या एकषष्ठांश म्हणजेच १६.३३ टक्के मते किंवा त्यापेक्षा कमी मते मिळाल्यास, त्यांची अनामत रक्कम जप्त केली जाते. याचा अर्थ असा की, ज्या उमेदवाराने २५,००० रुपये किंवा १०,००० रुपये रक्कम जमा केली असल्यास, त्यांना निवडणूक आयोगाकडून कोणताही परतावा दिला जाणार नाही. उदाहरणार्थ- जर विधानसभेच्या जागेवर एकूण २,००,००० मते पडली, तर सुरक्षा ठेव वाचविण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला एकूण वैध मतांपैकी एक-षष्ठांश मते मिळवावी लागतील. याचा अर्थ प्रत्येक उमेदवाराला ३३,३३२ पेक्षा जास्त मते मिळणे आवश्यक आहे. २०२४ विधानसभा निवडणुकीत एकूण उमेदवारांपैकी जवळपास ८३.८३ टक्के उमेदवारांनी त्यांची अनामत रक्कम गमावली आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय उमेदवारमतदारसंघ - एकूण उमेदवार - अनामत जप्तची संख्या

  • मिरज १४ - १२
  • सांगली १४ - १२
  • इस्लामपूर १२ -   १०
  • शिराळा ०६ - ०४
  • पलूस-कडेगाव ११ - ०९
  • खानापूर  १४ - १२
  • तासगाव-क.महांकाळ १७ - १५
  • जत   ११ - ०९
  • एकूण  ९९ - ८३
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीcongressकाँग्रेसwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024