शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम विरोधात सांगलीत नागरीकांचा महामोर्चा, पोलिसांसह प्रशासनाची तारांबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 19:26 IST

घोषणाबाजीने शहर हादरले

दिलीप मोहिते विटा ( जि. सांगली) : विधानसभा निवडणूकीत ईव्हीएम यंत्राची छेडछाड केल्याचा आरोप करीत संतप्त झालेल्या नागरीकांनी बुधवारी विटा तहसील कार्यालयावर महामोर्चा काढला. यावेळी ईव्हीम हटवा, लोकशाही वाचवा, यासह अनेक घोषणांनी शहर हादरवून सोडले. यावेळी संतप्त आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रतिकात्मक ईव्हीएम यंत्राची होळी केली.महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणूकीत भाजपसह महायुतीने यश संपादन केले. हे यश जनतेचे नसून ईव्हीएम यंत्राचे असल्याचा आरोप सर्वस्तरातून होऊ लागला आहे. बुधवारी महाविकास आघाडीचे उमेदवार अ‍ॅड.वैभव पाटील, अपक्ष माजी आ. राजेंद्र देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संग्राम माने. प्रहारचे उमेदवार भक्तराज ठिगळे यांच्यासह अन्य उमेदवारांच्या नेतृत्वाखाली विटा तहसील कार्यालयावर धडक दिली.हा महामोर्चा मायणी रस्ता, प्रसाद चित्रमंदीर, क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आला. त्यावेळी संतप्त नागरीकांनी प्रतिकात्मक ईव्हीएम यंत्राची होळी करीत यंत्राला जोडे मारले. यावेळी नागरीकांनी पन्नास खोके.. एकदम ओके, ईव्हीएम हटवा.. देश वाचवा यासह अन्य घोषणा देत ईव्हीएम प्रक्रियेचा निषेध केला.या मोर्चा महिलांचा सहभागही मोठा होता. यानंतर अ‍ॅड. वैभव पाटील, राजेंद्र देशमुख, संग्राम माने, भक्तराज ठिगळे यांच्याहस्ते तहसीलदार योगेश्वर टोंपे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अ‍ॅड. वैभव पाटील यांनी ईव्हीएममुळे महायुती सत्तेत आली असून यात मोठी छेडछाड झाल्याचा आरोप करीत झालेली ही निवडणूक प्रक्रिया रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी केली.माजी आ. राजेंद्र देशमुख यांनी महायुतीने ईव्हीएम यंत्रात चुकीच्या पध्दतीने छेडछाड करून लोकशाहीचा गळा घोटला आहे. आमच्या हक्काच्या गावांत आमच्याच लोकांनी आम्हाला मते देऊनही ती मते आम्हाला मिळाली नाहीत. त्यामुळे हा सर्व प्रकार संशयास्पद असून ईव्हीएम विरोधात आमचा लढा कायम सुरू राहणार असल्याचे सांगितले.यावेळी संग्राम माने यांनीही या प्रकाराचा निषेध केला. या महामोर्चात विटा शहरासह खानापूर, आटपाडी व विसापूर सर्कलमधील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीEVM Machineईव्हीएम मशीनagitationआंदोलनwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024