शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
3
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
4
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
5
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
6
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
7
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
8
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
9
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
10
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
11
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
12
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
13
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
14
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
15
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
16
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
17
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य
18
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
19
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
20
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे

काँग्रेसचे सांगली, जत मतदारसंघांतील बूथच्या मत पडताळणीसाठी अर्ज; किती रुपये केले जमा.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 18:55 IST

पृथ्वीराज पाटील, विक्रमसिंह सावंत यांचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल

सांगली : विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम यंत्रांवर संशय व्यक्त करत काँग्रेसनेसांगली १० आणि जत विधानसभा मतदारसंघांतील दोन बूथच्या मतपडताळणीची मागणी केली आहे. त्यासाठी सांगलीचे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील, जतमधून उमेदवार विक्रमसिंह सावंत यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला आहे. मतपडताळणीसाठीची पाच लाख ६६ हजार ४०० रुपये जमा केले आहेत.विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर महाविकास आघाडीतील बहुतांश वरिष्ठ नेत्यांनी ईव्हीएम यंत्रावर संशय व्यक्त केला आहे. उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात मतपडताळणीची मागणी करावी, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सांगली आणि जत मतदारसंघांसाठी पराभूत उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक विभागाच्या नियमानुसार, एका बूथच्या मत पडताळणीसाठी ४७ हजार २०० रुपये शुल्क भरावा लागतो. जतमध्ये विक्रमसिंह सावंत यांनी दोन बूथच्या पडताळणीची मागणी करून ९४ हजार ४०० रुपये भरले आहेत. सांगलीत पृथ्वीराज पाटील यांनी दहा बूथच्या पडताळणीची मागणी करत चार लाख ७२ हजार रुपये भरले आहेत.

नियमानुसार, या दोन्ही उमेदवारांनी कोणत्या बूथबाबत शंका आहेत, त्या यंत्रांचे क्रमांकही सादर केले आहेत. त्यासाठी एक तज्ज्ञ प्रतिनिधी सुचवण्यात आला आहे. ही प्रक्रिया कधीपर्यंत पार पाडली जाईल, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.

पाच टक्क्यांपर्यंत यंत्र, चिठ्ठ्यांची पडताळणीनिवडणूक आयोगाच्या धोरणानुसार, एकूण मतदान यंत्रांच्या पाच टक्के यंत्र व चिठ्ठ्यांची पडताळणी केली जाऊ शकते. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेले उमेदवार त्याची मागणी करू शकतात.

या केंद्रावर होणार मतपडताळणीसांगली विधानसभा मतदारसंघातील बुथ नंबर १५, २०, ७२, ९७, १३८, १९०, २४२, २७७, २९४, ३१३ आणि जत विधानसभा मतदारसंघातील दरीबडची येथील बुथ नंबर २२०, २२१ केंद्रांवरील बूथच्या मतपडताळणीची मागणी काँग्रेसने केली आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाकडून मतपडताळणी होणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीjat-acजाटcongressकाँग्रेसVotingमतदानwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024