शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

"प्रकल्प गुजरातला गेले तरी त्रिकुट बोलत नाही कारण...";  इस्लामपुरातून जयंत पाटलांची महायुतीवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 19:09 IST

गेली ३५ वर्षे इस्लामपूरचे आमदार असलेल्या जयंत पाटील यांना रोखण्यासाठी अजित पवार यांनी निशिकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

Islampur Assembly Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात भाजपमधून राष्ट्रवादी पक्षात आलेले निशिकांत पाटील यांना उमेदवारी देऊन अजित पवार यांनी खेळी केली आहे. गेली ३५ वर्षे इस्लामपूरचे आमदार असलेल्या जयंत पाटील यांना रोखण्यासाठी अजित पवार यांनी निशिकांत पाटील यांना उमेदवारी दिली. निशिकांत पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरताना अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. फूट पाडायला हा माणूस तरबेज असल्याचे म्हणत अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर आता जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच महाराष्ट्राची घसरलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्याचे काम आम्ही करणार असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

इस्लामपूर मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्याने निशिकांत पाटील यांनी भाजपचा राजीनामा दिला होता. त्यानंतर निशिकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश उमेदवारी मिळवली होती. उमेदवारी अर्ज भरण्याआधी घेतलेल्या सभेत अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता.  फूट पाडण्यात समोरचा माणूस तरबेज आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यानंतर आता जयंत पाटील यांनीही सोशल मिडिया पोस्टमधून भाष्य केलं आहे.

"एक नेते येथे येऊन गेले आणि ते म्हणाले की पेठेपासून सांगलीचा रस्ता यांना करता आला नाही. २०१६ पासून हा रस्ता केंद्र सरकारकडे वर्ग करण्यात आला. त्यामुळे ही जबाबदारी केंद्र सरकारमध्ये बसलेल्या पक्षाची आहे. गेल्या आठ वर्षांपासून ते हा रस्ताच करत आहेत. गडकरी साहेबांना मी यापूर्वी देखील विनंती केली आहे. आता या रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावर टोल लागू नये हा माझा आग्रह होता. आता मात्र या मार्गावर टोल लागणार आहे. थोडा विरोध झाल्याशिवाय आपलाही कामाचा स्पीड वाढत नाही. आज महाराष्ट्र राज्य दरडोई उत्पन्नात गुजरातपेक्षाही मागे गेले आहे. असंख्य प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेले. मात्र हे त्रिकुट काही बोलत नाही. कारण यांच्या डोक्यावर टांगत्या तलवारी आहेत. मतदारांना विकत घेण्याची मानसिकता यांची आहे. मात्र तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने उद्याचे सरकार हे महाविकास आघाडीचे असेल. महाराष्ट्राची घसरलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्याचे काम आम्ही करू," असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

"यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार निशिकांत पाटील यांना संधी द्या. आपण या तालुक्याला बारामतीपेक्षा चांगले बनवू. राजारामबापूंनी उभ्या केलेल्या संस्थांमध्ये नंतर जयंत पाटील यांनी काय केलं? संस्था योग्य पद्धतीने वाढवल्या का? असला मुख्यमंत्री करायचा का? करेक्ट कार्यक्रम करायचा त्यांच्या हातात नाही. ते जनतेच्या हातात आहे. करेक्ट कार्यक्रम करून लोकांचं भलं होत नाही," अशी टीका अजित पवारांनी केलं होतं. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024islampur-acइस्लामपूरJayant Patilजयंत पाटील