शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : जयंतराव, निवडणूक तुमच्या हाताबाहेर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 15:07 IST

विधानसभा निवडणुकीत मॅनेज करून मते खायचा प्रयत्न असेल, तर एक माणूस मॅनेज कराल, जनता मॅनेज होणार नाही. निवडणूक तुमच्या हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे जयंतराव, ही निवडणूक तुम्हाला सोपी नाही. गौरव नायकवडी हे कालचं पोरगंच तुम्हाला अस्मान दाखवेल, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिला.

ठळक मुद्देजयंतराव, निवडणूक तुमच्या हाताबाहेर ठाकरे यांची शिवसेनेचे उमेदवार गौरव नायकवडी यांच्यासाठी सभा

इस्लामपूर : विधानसभा निवडणुकीत मॅनेज करून मते खायचा प्रयत्न असेल, तर एक माणूस मॅनेज कराल, जनता मॅनेज होणार नाही. निवडणूक तुमच्या हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे जयंतराव, ही निवडणूक तुम्हाला सोपी नाही. गौरव नायकवडी हे कालचं पोरगंच तुम्हाला अस्मान दाखवेल, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिला.इस्लामपूर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार गौरव नायकवडी यांच्यासाठी येथील यल्लम्मा चौकात झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार धैर्यशील माने, खासदार संजयकाका पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख, निवेदिता माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

ठाकरे म्हणाले की, मला शेतीतील काही कळत नसले तरी, माझे शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रूंशी नाते आहे. महायुतीचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्त करणार आहे. अल्पभूधारक शेतकरी मजुरांना वर्षाला दहा हजार देणार आहे. तीनशे युनिटच्या वीज वापर बिलात तीस टक्क्यांची कपात करू. सुशिक्षित बेरोजगारांना शासनाची शिष्यवृत्ती देणार आहोत. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या कर्तृत्वाला साजेसे स्मारक उभारणार आहोत.सदाभाऊ खोत म्हणाले की, वाळवा तालुक्यात भगवे वादळ उठले आहे. त्यामुळे गौरव नायकवडी यांच्यासाठी आम्ही सगळे मिळून कामाला लागलो आहोत. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख, नगरसेवक शकील सय्यद, नगरसेवक बाबासाहेब सूर्यवंशी, वैभव शिंदे, विक्रम पाटील, पृथ्वीराज पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. माजी आमदार भगवानराव साळुंखे, प्रकाश शेंडगे, राहुल महाडिक, भीमराव माने उपस्थित होते.

टॅग्स :islampur-acइस्लामपूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSangliसांगली