शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांनी आश्वासनांच्या पुड्या सोडल्या : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 15:12 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ आश्वासनांच्या पुड्या सोडण्याचे काम केले आहे. म्हणे ते लंगोट नेसून उभे आहेत आणि पैलवान नाही. कुस्ती आणि मातीतला पैलवान काय असतो, हे त्यांनी आजवर पाहिलेले नाही. त्यांनी एकदा त्यांचा तेल लावलेला आणि लंगोट घातलेला फोटो काढून टाकावा म्हणजे कळेल, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मारला.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी आश्वासनांच्या पुड्या सोडल्या : जयंत पाटीलकामेरीत शिराळा मतदार संघातील राष्ट्रवादी मानसिंगराव नाईक यांच्यासाठी प्रचार

कामेरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ आश्वासनांच्या पुड्या सोडण्याचे काम केले आहे. म्हणे ते लंगोट नेसून उभे आहेत आणि पैलवान नाही. कुस्ती आणि मातीतला पैलवान काय असतो, हे त्यांनी आजवर पाहिलेले नाही. त्यांनी एकदा त्यांचा तेल लावलेला आणि लंगोट घातलेला फोटो काढून टाकावा म्हणजे कळेल, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मारला.कामेरी (ता. वाळवा) येथे शिराळा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी व काँग्रेसचे उमेदवार मानसिंगराव नाईक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. आ. पाटील म्हणाले, देशात मोदी, शहा यांनी चालविलेली हुकूमशाही व राज्यातील पेशवाई दूर करण्यासाठी मानसिंगराव नाईक यांना विजयी करावे.

या मतदार संघातील विद्यमान आमदारांची वाईट परिस्थिती असतानाही, त्यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. आमचे साडू सत्यजित देशमुख यांना वाटत होते, त्यांना भाजप उमेदवारी देईल. मात्र त्यांना ती दिली नाही. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. या मतदार संघातील शिवाजीराव नाईक यांचा पराभव होत नाही, तोपर्यंत त्यांना उमेदवारी मिळणार नाही.

मानसिंगराव नाईक म्हणाले, विद्यमान आमदार यांनी लोकांचा विश्वासघात केला आहे. शेतकऱ्यांचे पैसे बुडवले आहेत. त्यांचा दारुण पराभव करण्यासाठी जनता मतदानाची वाट बघत आहे.सुनील पाटील यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित पाटील, बी. के. नायकवडी, छायाताई पाटील, राहुल मोहिते, अ‍ॅड. रवी पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी देवराज पाटील, विजय पाटील, जगदीश पाटील, भीमराव पाटील, संजीव पाटील, छगन पाटील, अरुण कांबळे, शिवाजीराव साळुंखे, सुनीता देशमाने उपस्थित होते.

टॅग्स :islampur-acइस्लामपूरJayant Patilजयंत पाटीलSangliसांगली