महापालिकेच्या भाेंगळ कारभारामुळे पूरपट्ट्यातील झोपड्यांमध्ये महापुराचे पाणी : शरद पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:27 IST2021-07-29T04:27:30+5:302021-07-29T04:27:30+5:30
प्रा. पाटील यांनी सांगली - मिरजेत महापुराचे पाणी शिरलेल्या झोपडपट्टयांची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, महापालिकेने केंद्र व राज्य ...

महापालिकेच्या भाेंगळ कारभारामुळे पूरपट्ट्यातील झोपड्यांमध्ये महापुराचे पाणी : शरद पाटील
प्रा. पाटील यांनी सांगली - मिरजेत महापुराचे पाणी शिरलेल्या झोपडपट्टयांची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, महापालिकेने केंद्र व राज्य शासनाच्या गृहनिर्माण योजनेतून मोठ्या प्रमाणावर बांधलेल्या सदनिका रिकाम्या पडल्या आहेत. महापालिकेकडे पैसे भरलेल्या झोपडपट्टीधारकांना त्याचा ताबा अद्याप मिळालेला नाही. याबाबत जनता दलातर्फे यापूर्वीच तक्रारी केल्या आहेत. यानंतर यात गैरकारभार करणाऱ्या काही अधिकाऱ्यांचे निलंबन व काहींची बदली करण्यात आली. महापालिकेने राबविलेल्या गृहनिर्माण योजनेची चौकशी करण्याची मागणी केंद्रीय व राज्य गृहनिर्माण मंत्री, नगर विकासमंत्र्यांकडे करणार असल्याचेही यावेळी प्रा. शरद पाटील यांनी सांगितले. पाटील यांच्या पुढाकाराने झोपडपट्टीत जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी शशिकांत गायकवाड, जनार्दन गोंधळी, फैय्याज झारी, शब्बीर आलासे, एस. के. किराड, शाम कांबळे, सलीम सय्यद, सुधीर बनसोडे, सुमित पाटील उपस्थित होते.