महापालिका क्षेत्रात १९४ केंद्रावर आज महालसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:32 IST2021-09-15T04:32:29+5:302021-09-15T04:32:29+5:30
सांगली : महापालिका क्षेत्रात बुधवारी १९४ केंद्रांवर महा लसीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व ती यंत्रणा सज्ज असल्याची ...

महापालिका क्षेत्रात १९४ केंद्रावर आज महालसीकरण
सांगली : महापालिका क्षेत्रात बुधवारी १९४ केंद्रांवर महा लसीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व ती यंत्रणा सज्ज असल्याची माहिती लसीकरणाचे नोडल अधिकारी डाॅ. वैभव पाटील यांनी दिली.
डॉ. पाटील म्हणाले की, शासनाकडून बाह्य लसीकरण सत्र घेण्याबाबत निर्देश दिल्यानंतर जिल्हा आणि महापालिका प्रशासनाकडून बुधवारी कोविड महालसीकरण अभियान आयोजित केले आहे. यासाठी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रात १९४ लसीकरण केंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत लसीकरण केले जाणार आहे. यासाठी कल्लोळी हाॅस्पिटल, मिशन रुग्णालय, गुलाबराव पाटील, माने नर्सिंग, घाडगे, देसाई या नर्सिंग कॉलेजच्या प्रत्येकी २० शिकाऊ परिचारिकांची मदत घेतली आहे. महालसीकरण मोहिमेचा लाभ घेऊन महापालिका क्षेत्र कोरोनामुक्त करण्यासाठी साथ द्यावी, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.
चौकट
एकूण लाभार्थी : ४.१० लाख
प्रत्यक्षात लसीकरण : २.४३ लाख
लस न घेतलेले : १.६७ लाख