जोरदार पावसाने महालक्ष्मी, कोयना, हुबळी एक्स्प्रेस रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:17 IST2021-07-23T04:17:51+5:302021-07-23T04:17:51+5:30

राज्यात व मुंबईत मुसळधार पावसामुळे मुंबईतून सुटणाऱ्या अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. बुधवारी रात्री कोल्हापूरहून सुटलेली ...

Mahalakshmi, Koyna, Hubli Express canceled due to heavy rains | जोरदार पावसाने महालक्ष्मी, कोयना, हुबळी एक्स्प्रेस रद्द

जोरदार पावसाने महालक्ष्मी, कोयना, हुबळी एक्स्प्रेस रद्द

राज्यात व मुंबईत मुसळधार पावसामुळे मुंबईतून सुटणाऱ्या अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. बुधवारी रात्री कोल्हापूरहून सुटलेली महालक्ष्मी एक्स्प्रेस रात्री पुण्यातच थांबविण्यात आली. तेथून पुढे ती रद्द करण्यात आली. गुरुवारी मुंबईतून सुटणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली.

जाणाऱ्या व येणाऱ्या अशा कोयना एक्स्प्रेसच्या दोन्ही फेऱ्या रद्द करण्यात आल्या. बुधवारी सुटलेली हुबळी-एलटीटी कुर्ला एक्स्प्रेस पुण्यात थांबविण्यात आली. गुरुवारी कुर्ला येथून सुटणारी हुबळी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. दादर येथून सुटणारी म्हैसूर एक्स्प्रेस पुण्यातून सोडण्यात येणार आहे.

कोकण रेल्वेमार्गावर दरड कोसळल्याने अनेक एक्स्प्रेस गाड्या बेळगाव-मिरज-पुणे मार्गे वळविण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वेमार्गावरील निजामुद्दीन-एर्नाकुलम एक्स्प्रेस, एर्नाकुलम-ओखा एक्स्प्रेस, कुर्ला-तिरुवअनंतपूरम एक्स्प्रेस, हासा-मडगाव एक्स्प्रेस, हिस्सार-कोईमतूर एक्स्प्रेस, वेरावल-तिरुवअनंतपूरम एक्स्प्रेस, मंगला-एक्स्प्रेस मिरजमार्गे रवाना झाल्या.

Web Title: Mahalakshmi, Koyna, Hubli Express canceled due to heavy rains