शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

महांकाली कारखान्यावर दोन बँकांचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 12:26 IST

थकीत कर्जापोटी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने डिसेंबरमध्ये कवठेमहांकाळच्या महांकाली साखर कारखान्याचा प्रतिकात्मक ताबा घेतला असताना, बँक आॅफ इंडियानेही ४८ कोटीच्या थकबाकीपोटी महांकाली कारखान्याचा ताबा घेतल्याची नोटीस प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे महांकाली कारखान्याच्या थकीत कर्जवसुलीसाठी दोन्ही बँका आमने-सामने आल्या आहेत.

ठळक मुद्देमहांकाली कारखान्यावर दोन बँकांचा ताबाथकीत कर्जवसुलीसाठी दोन्ही बँका आमने-सामने

सांगली : थकीत कर्जापोटी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने डिसेंबरमध्ये कवठेमहांकाळच्या महांकाली साखर कारखान्याचा प्रतिकात्मक ताबा घेतला असताना, बँक आॅफ इंडियानेही ४८ कोटीच्या थकबाकीपोटी महांकाली कारखान्याचा ताबा घेतल्याची नोटीस प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे महांकाली कारखान्याच्या थकीत कर्जवसुलीसाठी दोन्ही बँका आमने-सामने आल्या आहेत.बँक आॅफ इंडियाच्या कवठेमहांकाळ शाखेमार्फत महांकालीला कर्जपुरवठा करण्यात आला होता. कारखान्याकडे सध्या ४८ कोटी ७३ लाख ६५ हजार ५२४ रुपये थकबाकी आहे. या थकबाकीपोटी बँकेने कारखान्यास १२ एप्रिल २0१९ रोजी सिक्युरिटायझेशन अ‍ॅक्टअंतर्गत नोटीस बजावली होती.

त्यास प्रतिसाद न मिळाल्याने बँक आॅफ इंडियाने १६ जानेवारी २0२0 रोजी कारखान्याच्या मालमत्तांचा ताबा घेतल्याची नोटीस गुरुवारी प्रसिद्ध केली. या मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये, असे बँकेने म्हटले आहे.दुसरीकडे महांकाली साखर कारखान्याला जिल्हा बॅँकेने १३८ कोटी ५३ लाख ९५ हजार रुपयांच्या थकीत कर्जवसुलीसाठी २८ आॅगस्ट २०१९ रोजी मागणी नोटीस बजावली होती.कारखान्याच्या कार्यकारी संचालकांसह संचालक अनिता विजय सगरे, दीपक ओलेकर, आदगोंडा पाटील, किसन पोटोळे, आप्पासाहेब कोळेकर, हणमंत शिंदे, संभाजी पाटील, पुंडलिक पाटील, सुभाष पाटील, शिवाजी कोळेकर, कोंडीबा हारगे, जीवन भोसले, बाळासाहेब ओलेकर, गणपती सगरे, रामचंद्र जगताप, पद्मिनी कुणूरे, शशिकला पाटील, रूद्रगोंडा पाटील, तानाजी भोसले यांना बॅँकेने नोटीस बजावून, ६० दिवसात थकबाकी भरण्यास सांगितले होते. पण मुदतीत त्यांनी थकबाकी न भरल्याने कारखान्यासह स्थावर व जंगम मालमत्तेचा जिल्हा बँकेने सोमवारी प्रतिकात्मक ताबा घेतला.अन्य कोणत्याही बॅँका व वित्तीय संस्थांनी महांकाली कारखान्याच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व्यवहार करू नये, केल्यास त्यांच्यावर जिल्हा बॅँकेचे थकीत कर्ज फेडण्याची जबाबदारी राहील, अशी नोटीस प्राधिकृत अधिकारी एम. बी. पाटील यांनी दिली आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रSugar factoryसाखर कारखानेSangliसांगली