महाडिक मल्टिस्टेटला ३९ लाखांचा नफा : राहुल महाडिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:22 IST2021-04-05T04:22:55+5:302021-04-05T04:22:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : वनश्री नानासाहेब महाडिक मल्टिस्टेट अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी या संस्थेला मार्चअखेर संपलेल्या आार्थिक वर्षात ...

महाडिक मल्टिस्टेटला ३९ लाखांचा नफा : राहुल महाडिक
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वनश्री नानासाहेब महाडिक मल्टिस्टेट अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी या संस्थेला मार्चअखेर संपलेल्या आार्थिक वर्षात संस्थेस ३९ लाख ६ हजार ३२२ रुपयांचा नफा झाला असल्याची माहिती संस्थापक राहुल महाडिक यांनी दिली.
वनश्री नानासाहेब यांच्या नावे सुरू केलेल्या संस्थेस स्थापनेपासून सतत ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला असून, संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग व सभासद, ठेवीदार यांच्या विश्वासावर चाललेली एक आदर्श संस्था म्हणून ओळखली जात आहे.
आर्थिक वर्षामध्ये संस्थेचे अधिकृत भागभांडवल १० कोटी आहे. वसूल भागभांडवल ५ कोटी ४६ लाख इतके आहे. एकूण गुंतवणूक २३ कोटी ४० लाख एवढी आहे. संस्थेच्या ६० कोटी ४० लाख ठेवी आहेत. कोविड १९ कर्जदारांनीसुद्धा १०० टक्के आपल्या कर्जाची परतपेड केली म्हणून संस्थापक राहुल महाडिक यांनी आभार मानले. संस्थेच्या शाखेच्या माध्यमातून बँकिग सुविधा जास्तीत जास्त सभासदांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. संस्थेने विविध सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना काळातही संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सतीश महाडिक व उपाध्यक्ष रवींद्र आडमुठे, संचालक प्रा. प्रदीप पाटील, कपिल ओसवाल, सुशील सावंत, नागेश पाटील, सागर कोरोचे, राजू मुंडे, तसेच सर्व शाखांचे शाखाधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. स्वागत व्यवस्थापक आर.एम. बागडी यांनी केले व शाखा व्यवस्थापक अमोल पाटील यांनी आभार मानले.