शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

महाडिक बंधू-राजवर्धन पाटील भेटीने चर्चेला उधाण -: विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 23:05 IST

आगामी विधानसभा निवडणुकीची हवा तापू लागली आहे. इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात इच्छुकांची गर्दी आहे. राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची दोन्ही मुले मतदारसंघात यापूर्वीच सक्रिय झाली आहेत. शुक्रवार, दि. १४ रोजी सकाळी आ. पाटील यांचे पुत्र राजवर्धन पाटील यांनी

ठळक मुद्दे सांत्वनपर भेट असल्याचा निर्वाळा; इस्लामपूर-शिराळ्यात नवी समीकरणे

अशोक पाटील ।इस्लामपूर : आगामी विधानसभा निवडणुकीची हवा तापू लागली आहे. इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात इच्छुकांची गर्दी आहे. राष्टवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची दोन्ही मुले मतदारसंघात यापूर्वीच सक्रिय झाली आहेत. शुक्रवार, दि. १४ रोजी सकाळी आ. पाटील यांचे पुत्र राजवर्धन पाटील यांनी पेठनाक्यावर जाऊन राहुल महाडिक व सम्राट महाडिक या बंधूंची सांत्वनपर भेट घेतली. मात्र या भेटीमुळे राजकीय चर्चेला ऊत आला आहे.

इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांनी संपर्क वाढवला आहे. ग्रामीण भागातील बुथ कमिट्या सक्षम करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ते तळागाळातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. प्रदेशाध्यक्षपद असल्याने त्यांच्यावर राज्याची जबाबदारी आहे. निवडणुकीत त्यांना स्वत:च्या मतदारसंघात वेळ देता येणार नाही. यासाठी त्यांनी आता वेळ मिळेल तसे मतदारसंघातील महत्त्वाच्या गावांना भेटी देण्यावर भर दिला आहे. प्रत्येक गावात प्रभागनिहाय १२ बैठका ते घेत आहेत.सामाजिक, सांस्कृतिक व इतर सुख-दु:खांच्या प्रसंगात सहभागी होण्याची जबाबदारी आ. पाटील यांनी प्रतीक व राजवर्धन पाटील या दोन्ही मुलांवर सोपवली आहे. याच भूमिकेतून राजवर्धन यांनी शुक्रवारी सकाळी पेठनाक्यावरील ‘सम्राट’ या निवासस्थानी जाऊन महाडिक बंधूंची भेट घेतली. नानासाहेब महाडिक यांच्या निधनानंतर महाडिक कुटुंबीयांची भेट घेता आली नव्हती, त्यामुळे आता भेटल्याचे राजवर्धन यांनी सांगितले. या तिघांनी मिळून तब्बल दीड तासाहून अधिक वेळ एकत्र घालवला. यामुळे ही भेट नेमकी भावपूर्णच होती, की याला राजकीय रंग होता, या चर्चेला ऊत आला आहे.इस्लामपूर मतदारसंघात महाडिक गटाची भूमिका महत्त्वाची आहे. शिराळा मतदारसंघात सम्राट महाडिक यांनी शड्डू ठोकला आहे. या मतदारसंघातील ४९ गावांमध्ये आमदार पाटील यांचा गट भक्कम आहे. त्यामुळे या भेटीबाबत चर्चा सुरू झाली आहे.

आंब्याची पेटी भेटनानासाहेब महाडिक यांनी फोंडा येथे मोठ्या प्रमाणात फळझाडे लावली आहेत. विविध जातीच्या आंब्याची झाडेही आहेत. त्यामुळेच महाडिक यांना वनश्री पुरस्कार देण्यात आला होता. त्यांच्या स्मरणार्थ महाडिक बंधूंनी राजवर्धन पाटील यांना आंब्याची पेटी भेट दिली. 

 

नानासाहेब महाडिक यांच्या निधनानंतर काही कारणांमुळे महाडिक कुटुंबीयांची भेट घेता आली नाही. आजच्या भेटीला कोणताही राजकीय रंग नाही. सांत्वन आणि फक्त ओळख व्हावी, यासाठीच आपण महाडिक यांच्या निवासस्थानी गेलो होतो.- राजवर्धन पाटील.नानासाहेब महाडिक यांच्या निधनानंतर राज्यासह जिल्ह्यातील अनेकांनी आमच्या भेटी घेतल्या आहेत. यानिमित्ताने राजवर्धनही भेटण्यास आले होते. दीड तासाहून अधिक वेळ आमच्या निवासस्थानी ते होते. या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नसली तरी, आपापल्या जीवनातील विविध पैलूंवर बोलणे झाले.- सम्राट महाडिक

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगलीElectionनिवडणूक