शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सांगली विधानसभेसाठी मदनभाऊ गट सरसावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 15:39 IST

सांगली विधानसभा मतदारसंघातून मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षाचे कार्याध्यक्ष आमदार विश्वजित कदम यांच्याकडे केली, तर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनाही निवेदन पाठवून देण्यात आले. दरम्यान, मदनभाऊ गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक विष्णुअण्णा भवन येथे पार पडली. या बैठकीत विधानसभा मोठ्या ताकदीने लढण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देसांगली विधानसभेसाठी मदनभाऊ गट सरसावलाजयश्रीताई पाटील यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी देण्याची मागणी

सांगली : सांगलीविधानसभा मतदारसंघातून मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षाचे कार्याध्यक्ष आमदार विश्वजित कदम यांच्याकडे केली, तर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनाही निवेदन पाठवून देण्यात आले. दरम्यान, मदनभाऊ गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक विष्णुअण्णा भवन येथे पार पडली. या बैठकीत विधानसभा मोठ्या ताकदीने लढण्याचा निर्णय घेण्यात आला.सांगली विधानसभेसाठी काँग्रेसकडून शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, अखिल भारतीय काँग्रेसच्या सदस्या जयश्रीताई पाटील इच्छुक आहेत. त्यांनी पक्षाकडे रितसर उमेदवारी मागितली आहे. त्यातच जयश्रीताई पाटील या विधानसभेच्या रणांगणात उतरणार की नाही? अशी चर्चा सुरू झाली होती. पण मदनभाऊ गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी जयश्रीताई पाटील यांची भेट घेत, विधानसभा निवडणूक लढण्याचा आग्रह धरला. श्रीमती पाटील यांनीही त्याला हिरवा कंदील दाखविल्याचे समजते. त्यामुळे मदनभाऊ गटाने आता जयश्रीताई पाटील यांच्या उमेदवारीसाठी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. शुक्रवारी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या नगरसेवकांनी कडेगाव येथे काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. विश्वजित कदम यांची भेट घेतली. सांगलीतून जयश्रीताई पाटील यांनाच उमेदवारी द्यावी, आम्ही जिवाचे रान करून त्यांना निवडून आणू, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. आ. कदम यांनी, सांगलीच्या उमेदवारीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिली. जयश्रीताई पाटील यांना उमेदवारी द्यावी, या मागणीचे पत्र काँग्रेसच्या नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना पाठविले आहे.यावेळी माजी महापौर हारूण शिकलगार, माजी महापौर किशोर जामदार, किशोर शहा, नगरसेवक मनोज सरगर, संतोष पाटील, अभिजित भोसले, मंगेश चव्हाण, वर्षा निंबाळकर, फिरोज पठाण, उमेश पाटील, प्रकाश मुळके, करण जामदार, करीम मेस्त्री, संजय कांबळे, अमर निंबाळकर, रवींद्र वळवडे, दिलीप पाटील उपस्थित होते.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाSangliसांगलीcongressकाँग्रेस