सांगली जिल्ह्यात यंत्रणा सज्ज

By Admin | Updated: October 15, 2014 00:29 IST2014-10-15T00:28:22+5:302014-10-15T00:29:59+5:30

आठ मतदारसंघांतील १०७ उमेदवारांचे भवितव्य होणार यंत्रात बंद

The machinery of the Sangli district is ready | सांगली जिल्ह्यात यंत्रणा सज्ज

सांगली जिल्ह्यात यंत्रणा सज्ज

सांगली : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी उद्या, बुधवारी मतदान होत असून, १०७ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रांत बंद होणार आहे. जिल्ह्यातील २ हजार ३२८ मतदानकेंद्र्रांवर सकाळी सातपासून सायंकाळी सहापर्यंत मतदान होणार असून, प्रशासकीय व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. आठ विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण २२ लाख १६ हजार ६११ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी जिल्ह्यात २ हजार ३२८ मतदानकेंद्रे तयार करण्यात आली असून, मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी दहा हजारांहून अधिक कर्मचारी, अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यात एकही मतदारसंघ संवेदनशील नसला तरी, चुरशीची निवडणूक असणारी ४२ मतदानकेंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. जिल्ह्यात एकूण मतदारांमध्ये १० लाख ६४ हजार ७५१ महिला, तर ११ लाख ५२ हजार ३६४ पुरुष मतदार आहेत. १४ हजार १२९ शासकीय सेवेतील मतदार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी जाताना मतदार ओळखपत्र सोबत ठेवावे. मतदान ओळखपत्र नसल्यास अकरा पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा सोबत ठेवावा. मतदारांनी मतदारयादीत नाव असल्याची खात्री करून घ्यावी. संग्राम केंद्रे, सेतू कार्यालय, महा ई-सेवा केंद्र आदी ठिकाणी मतदारयादी पाहण्याची सोय करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यात ७४ व्हिडिओ कॅमेरे बसविण्यात आले असून, ४२ केंद्रांवर वेबकास्टिंगच्या माध्यमातून आॅनलाईन वॉच ठेवण्यात येणार आहे. मतदारांवर दबाव टाकला जाऊ नये म्हणून भरारी पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत. मतदारसंघनिहाय उमेदवार मतदारसंघ उमेदवार सांगली १९ मिरज १७ इस्लामपूर १३ शिराळा ९ पलूस-कडेगाव ११ खानापूर १३ तासगाव-क.म.१४ जत ११ एकूण १०७ निवडणूक एक नजर.... मतदारसंघ - ८ एकूण उमेदवार - १०७ महिला उमेदवार - ७ मतदार - २२,३०,७३४ महिला मतदार - १०,६४,४८२ पुरुष मतदार - ११,६४,४८२ मतदान केंद्रे - २,३२८ मतदानासाठी जिल्हा पोलीसप्रमुख, अतिरिक्त पोलीसप्रमुख, सहा पोलीस उपअधीक्षक, २३ पोलीस निरीक्षक, १३० उपनिरीक्षक, २०८९ पोलीस शिपाई, ९०० गृहरक्षक (होमगार्ड) दलाचे जवान, ८०० एसआरपी जवान असा अभूतपूर्व बंदोबस्त तैनात केला आहे.) मतदानासाठीची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे. कुणी प्रलोभन दाखवत असेल तर त्यांच्याबाबत जिल्हा तक्रार सनियंत्रण कक्षाच्या टोल फ्री क्रमांकावर कळवावे. - दीपेंद्र्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी, सांगली

Web Title: The machinery of the Sangli district is ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.