ए. एम. परीक्षेत अरविंद कोळी प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST2021-06-30T04:17:43+5:302021-06-30T04:17:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पेठ : कला संचालनालयातर्फे ए. एम. (आर्ट मास्टर) या उच्च कला पदविका परीक्षेत कासेगाव एज्युकेशन ...

ए. एम. परीक्षेत अरविंद कोळी प्रथम
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : कला संचालनालयातर्फे ए. एम. (आर्ट मास्टर) या उच्च कला पदविका परीक्षेत कासेगाव एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, पेठमधील कलाशिक्षक अरविंद अधिकराव कोळी यांनी महाविद्यालयात प्रथमश्रेणीसह प्रथम क्रमांक मिळविला.
ही परीक्षा त्यांनी इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील चित्रकला महाविद्यालयातून दिली. अरविंद कोळी यांनी ए. एम. परीक्षेत ९०० पैकी ५७७ गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला आहे. कोळी यांना आदर्श शिक्षक पुरस्कारानेही सन्मानित केले होते. त्यांच्या विशिष्ट कौशल्यपूर्ण फलकरेखाटन कलेलाही महाराष्ट्रातून दाद मिळत आहे. ए. एम. परीक्षेतील यशाबद्दल प्राचार्य प्रदीप पाटील, कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव आर. डी. सावंत, डॉ. राजेंद्र कुरळपकर, अधीक्षक ए. डी. पाटील, पर्यवेक्षक एस. एल. माने, एस. एम. पवार, मुख्याध्यापक जे. पी. पाटील यांनी अभिनंदन केले.