शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात लम्पीने १० जनावरांचा मृत्यू, नवीन ११० बाधित; शेतकऱ्यांची चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 15:24 IST

लम्पीची साथ आटोक्यात येत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे

सांगली : जिल्ह्यात लम्पी त्वचा रोगाचा फैलाव वाढत असून संसर्गाचा विळखा पसरत आहे. बुधवारी दिवसात विक्रमी ११० जनावरांना लम्पीची बाधा झाली असून १० बाधित जनावरांचा मृत्यू झाला. पशुसंवर्धन विभागाकडून सुरू असलेल्या औषधोपचारामुळे ४४९ जनावरे लम्पीमुक्त झाले आहेत.लम्पी त्वचा रोगाने बाधित होणाऱ्या पशुधनाचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. बाधित जनावरांची संख्या दीड हजाराच्या घरात गेली आहे. बाधित असलेल्या ९१९ जनावरांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दोन महिन्यापासून लम्पी त्वचा रोगाचा संसर्ग सुरू झाला आहे. त्याला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासन उपाययोजना करत आहे. तरीही लम्पीची साथ आटोक्यात येत नसल्याचे दिसत आहे.बुधवारी नव्याने विक्रमी ११० जनावरांना बाधा झाल्याचे आढळून आले. जिल्ह्यात एक हजार ४४९ जनावरांना लम्पीचा संसर्ग झाला असून आत्तापर्यंत ९२ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर ४४९ जनावरे आजारातून बरी झालेली आहेत.

लसीकरणाच्या प्रभावावर प्रश्नचिन्हजिल्हा प्रशासनाकडे तीन लाख तीन हजार शंभर लसीचे डोस प्राप्त झाले होते. परंतु, लम्पीची साथ आटोक्यात येत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. लसीकरण झाल्यानंतर सुमारे २८ दिवसांनंतर त्याचा परिणाम दिसून येतो. सध्या लम्पी बाधित जनावरांची संख्या वाढत चालल्याने लसीकरणाचा प्रभाव झाला की नाही याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.

लम्पीचे तालुकानिहाय बाधित जनावरेआत्तापर्यंत लम्पीने बाधित झालेल्या जनावरांची तालुकानिहाय संख्या : मिरज तालुका ४४३, आटपाडी ९५, पलूस २००, वाळवा ३२२, खानापूर ९३, तासगाव ९१, कडेगाव ३६, कवठेमहांकाळ ८८, जत ७५, शिराळा २२.

टॅग्स :SangliसांगलीLumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोग