शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

लाडक्या लुसी श्वानाचं डोहाळ जेवण

By admin | Published: May 31, 2017 11:14 PM

लाडक्या लुसी श्वानाचं डोहाळ जेवण

शंकर पोळ। लोकमत न्यूज नेटवर्ककोपर्डे हवेली : ‘कोणीतरी येणार-येणार गं, पाहुणा घरी येणार-येणार गं’ हे गाण्याचे बोल कोणा महिलेसाठी नाही तर चक्क ग्रेहाउंड जातीच्या गरोदर श्वान मादीसाठी महिलांनी गायिले. वडोळी निळेश्वर, ता. कऱ्हाड येथील परिसरात अनिकेत डुबल या कुटूंबाने त्यांच्या घरी असलेल्या महाराणी ऐक्सप्रेस लुसी नावाच्या श्वान मादीचा अनोखा डोहाळे जेवण सोहळा साजरा करण्यात आला.वडोली निळेश्वर, ता. कऱ्हाड येथे अनिकेत डूबल यांच्या कुटूंबात लुसी नावाची श्वान मादीचे त्यांनी पालन केले आहे. महिलेचा ज्याप्रमाणे डोहाळे जेवण सोहळा साजरा करण्यात येतो, अगदी त्याचप्रमाणे लुसीचा हा डोहाळे जेवण सोहळा साजरा करण्याचा निर्णय कुटूंबियांच्यावतीने घेण्यात आला. लुसीला डुबल कुटूंबिय आपल्या कुटुंबातील एक सदस्य मानतात. घरातील सर्व लोक प्रेमाणे तिच्याबरोबर वागतात.लुसीला परिसरामध्ये ‘महाराणी एक्स्प्रेस-लुसी’या नावाने ओळखले जाते. आजपर्यंत लुसी शर्यतीच्या स्पर्धेत वेगवेगळ्या ठिकाणी सात वेळा विजेतेपदाची मानकरी ठरली आहे. महिलेच्या डोहाळे जेवणाप्रमाणेच लुसीचा सोहळाही डुबल कुटूंबियांनी यावेळी उत्साहात पार पडला. सोहळ्यावेळी घरातील आणि बाजूच्या परिसरातील महिलांनी गरोदर लुसीची हिरवापीस, नारळ, सुपारी, तांदूळ, हळकुंड आदिंनी ओटी भरली व हळदी कुंकु लावून औक्षण केले, फुलांचा हार घातला व तिच्या आवडीचे खाद्यपदार्थ तिला खाऊ घातले. त्यानंतर महिलांचा हळदीकुंकू समारंभ झाला व शेवटी भोजन कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याचे परिसरातून कौतुक होत आहे. यावेळी वडोली निळेश्वर गावच्या सरपंच सुरेखा सुरेश डुबल यांच्यासह कुटुंबातील सदस्य व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.महिलाही हरकल्या... महाराणी एक्सप्रेस लुसी या श्वानाच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम वडोली निळेश्वर मधील महिलांनी आनंद घेतला. गळ्यात, पायात हार घालून हळद कुंकू लावून लुसी सर्वांपुढे बसली होती. समोर होत असलेल्या कार्यक्रमाविषयी तिला काही समजत नसले तरीही आपले कोडकौतुक होत असल्याचे तिला समजत होते. या कार्यक़्रमाने महिलाही हरकल्या.