सहकार पॅनेलचा निष्ठेने प्रचार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:19 IST2021-06-22T04:19:19+5:302021-06-22T04:19:19+5:30
फोटो ओळ : चिंचणी (ता. कडेगाव) येथे सहकार पॅनेलच्या प्रचार सभेत पृथ्वीराज देशमुख यांनी मार्गदर्शन केले. कडेगाव : सभासदांना ...

सहकार पॅनेलचा निष्ठेने प्रचार करा
फोटो ओळ : चिंचणी (ता. कडेगाव) येथे सहकार पॅनेलच्या प्रचार सभेत पृथ्वीराज देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
कडेगाव :
सभासदांना केंद्रस्थानी ठेवून सहकार पॅनेल कारभार करण्यास कटिबद्ध राहील, यासाठी घाटमाथ्यावरून सहकार पॅनेलचा प्रचार निष्ठेने करून आपला विश्वास सार्थ करा, असे आवाहन सांगली जिल्हा भाजपाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी केले.
जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचारार्थ शिरसगाव, सोनसळ, पाडळी, सोनकिरे, आसद, अंबक, चिंचणी, तडसर येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी उमेदवार बाबासाहेब शिंदे, कृष्णा कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग होनमाने, भारत पाटील, प्रकाश पाटील, रामचंद्र महाडीक, हिंदुराव माने, श्रीपती माने, माणिक माने, सनी पाटील, युवराज कदम, हणमंतराव जाधव, पृथ्वीराज देशमुख, शिवाजी पाटील, राजाराम पवार उपस्थित होते.
पृथ्वीराज देशमुख म्हणाले की, डाॅ. भोसले यांनी कृष्णा कारखान्याची योग्यवेळी सूत्रे हाती घेऊन आर्थिक नियोजनातून कारखाना चालवून कारखान्याला ऊर्जितावस्थेत नेवून ठेवले आहे. कृष्णा उद्योगाच्या माध्यमातून अनेक लोकाभिमुख निर्णय घेत शेतकरी सभासदांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून दिले आहे. त्यांचा विश्वास आपण सार्थ ठरवून कामाला लागून सहकार पॅनेलच्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन देशमुख यांनी केले.