सात महिन्यांतील सर्वांत कमी बाधितांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:23 IST2021-02-05T07:23:14+5:302021-02-05T07:23:14+5:30
जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. त्यात सोमवारी बाधितांची निचांकी संख्या नोंदवली गेली. दोघांचा कोरोनाने मृत्यू ...

सात महिन्यांतील सर्वांत कमी बाधितांची नोंद
जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. त्यात सोमवारी बाधितांची निचांकी संख्या नोंदवली गेली. दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला असलातरी १६ जणांनी कोरोनावर मातही केली आहे.
जिल्ह्यात आरोग्य विभागाच्यावतीने आरटीपीसीआर अंतर्गत घेण्यात आलेल्या १३० जणांचे नमुने तपासण्यात आले त्यात ३ तिघांना कोरोनाचे निदान झाले आहे तर रॅपिड ॲन्टिजेनच्या १२८२ चाचण्यांमधून ३ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
जिल्ह्यातील पाच रुग्णालयांत १२९ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील ३९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील ३३ जण ऑक्सिजनवर तर ६ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील दोघांना कोराेनाचे निदान झाले आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ४८०२१
उपचार घेत असलेले १२९
कोरोनामुक्त झालेले ४६१४४
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७४८
सोमवारी दिवसभरात
जत २
वाळवा १
महापालिका क्षेत्रांसह अन्य तालुक्यांत एकही बाधित नाही