शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

शिराळ्यात नागपंचमीवेळी लाऊडस्पीकरवर बंदी, ड्रोनने ‘वॉच’; कायद्याचे पालन करण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 14:28 IST

नागपंचमीच्या अनुषंगाने रेकॉर्डवरील ५२ जणांना तडीपारीचे आदेश

शिराळा : येथील नागपंचमी धार्मिक परंपरेचा मान राखून, कायद्याचे पालन करून प्रबोधनात्मक ठरेल अशी साजरी करा, असे प्रतिपादन प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी बुधवारी केले. कानठळ्या बसवणाऱ्या ध्वनिक्षेपकांवर (लाऊड स्पीकर) कडक कारवाई करण्यात येणार आहे. ड्रोन कॅमेरे व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमार्फत लक्ष ठेवण्यात येणार आहे. पोलीस व वनविभागामार्फत दि. १ ते दि. ४ ऑगस्टपर्यंत बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, असेही सांगण्यात आले.दि. २ ऑगस्ट रोजी होणाऱ्या नागपंचमीच्या नियोजनासाठी येथील तहसील कार्यालयात आयोजित शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. तहसीलदार गणेश शिंदे, विभागीय पोलीस अधीक्षक कृष्णात पिंगळे, मुख्याधिकारी योगेश पाटील, रेणुका कोकाटे, सहायक वनसंरक्षक अजित साजन, गटविकास अधिकारी संतोष राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रांताधिकारी खिलारी म्हणाले, उत्सव साजरा करत असताना आपल्याकडून नियमाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. लाखो लोक यादिवशी येतात. त्यामुळे सर्व विभागांनी आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. समन्वय साधण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करावा. वनविभागाने जनजागृती आणि प्रबोधनावर भर द्यावा. मिरवणूक मार्ग तसेच महत्त्वाच्या ठिकाणी आवश्यक गोष्टी पुरविण्यात याव्यात.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. जे. के. मोमीन, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, वनक्षेत्रपाल सचिन जाधव, नायब तहसीलदार सचिन कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव वाघ, दीपक जाधव, सम्राट शिंदे, अर्चना गायकवाड उपस्थित होते.

५२ जणांना तडीपारीचे आदेशशिराळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपंचमीच्या अनुषंगाने रेकॉर्डवरील ५२ जणांना तडीपारीचे आदेश देण्यात येणार आहेत. ७५ डेसिबलवरील ध्वनिक्षेपकांवर कारवाई केली जाईल.

आठवडा बाजार रविवारी

सोमवार दि. १ ऑगस्टचा बाजार रविवार दि. ३१ रोजी भरणार आहे. आरोग्य विभागामार्फत नागपंचमीच्या दिवशी बूस्टर डोस देण्यासाठी पथक, महसूल, वन, पोलीस विभागामार्फत विविध शासकीय योजनांचे फलक, डिजिटल लावण्यात येणार आहेत.

टॅग्स :SangliसांगलीNag Panchamiनागपंचमीshirala-acशिराळा