भगवान महावीर अध्यासन केंद्र सुरू करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:31 IST2021-02-05T07:31:41+5:302021-02-05T07:31:41+5:30
सांगली : शिवाजी विद्यापीठामध्ये भगवान महावीर अध्यासन केंद्रासाठी जागा दिली आहे. लवकरच या जागेवर सात ते आठ कोटी रुपयांचे ...

भगवान महावीर अध्यासन केंद्र सुरू करणार
सांगली : शिवाजी विद्यापीठामध्ये भगवान महावीर अध्यासन केंद्रासाठी जागा दिली आहे. लवकरच या जागेवर सात ते आठ कोटी रुपयांचे सुसज्ज असे अध्यासन केंद्र उभारण्यात येणार आहे, अशी माहिती शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी दिली.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी दक्षिण भारत जैन सभेच्या सांगलीतील कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. शिर्के यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. जे. एफ. पाटील, भगवान महावीर अध्यासन केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. व्ही. बी. ककडे, सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील आदी उपस्थित होते.
डॉ. शिर्के म्हणाले, दक्षिण भारत जैन सभेच्या कार्याचा गौरव केला. तसेच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे भगवान महावीर अध्यासन केंद्रासाठी जागा दिल्याचे जाहीर केले. लवकरच या जागेवरती आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांच्या आराखड्याप्रमाणे सात ते आठ कोटी रुपयांचे खर्च करुन सुसज्ज असे भगवान महावीर अध्यासन केंद्र उभारण्यात येणार आहे.
पदवीधर संघटनेचे प्रा. एस. डी. अक्कोळे यांनी गेली दहा वर्षांपासून जैन प्रकृत विद्या भाषा प्रमाणपत्र परीक्षा शिवाजी विद्यापीठामार्फत घेतली जाते. जैन प्रकृत विद्या भाषा पदविका शिवाजी विद्यापीठामार्फत पदवीधर संघटनेकडून सुरू करण्याची परवानगी द्यावी म्हणून निवेदन देण्यात आले.
रावसाहेब पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये दक्षिण भारत जैन सभेमार्फत चालविण्यात येणारे विविध उपक्रमांचा आढावा घेतला. सभेचे मुख्य महामंत्री डॉ. अजित पाटील यांनी स्वागत केले. सभेचे खजिनदार संजय शेटे यांनी आभार मानले.