शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

‘लिफ्ट’ देण्याच्या बहाण्याने सांगलीत विद्यार्थ्यास लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 21:40 IST

सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथील श्रेयस श्रीनिवास जोशी (वय १७) या महाविद्यालयीन विद्यार्थ्यास ‘लिफ्ट’ देण्याच्या बहाण्याने मारहाण करून ...

ठळक मुद्दे दोघांविरुद्ध गुन्हा, धामणी रस्त्यावर नेऊन मारहाण

सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथील श्रेयस श्रीनिवास जोशी (वय १७) या महाविद्यालयीन विद्यार्थ्यास ‘लिफ्ट’ देण्याच्या बहाण्याने मारहाण करून लुटले. सोमवारी भरदिवसा ही घटना घडली. श्रेयसला दुचाकीवरुन धामणी रस्त्यावर नेले. तिथे बेदम मारहाण करून त्याच्याकडील पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल काढून चोरटे पसार झाले. याप्रकरणी रात्री उशिरा दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रेयस कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयात अकरावीत शिकतो. दिवाळीमुळे महाविद्यालयास सुटी आहे. तो कॉलेज कॉर्नरवरील खासगी क्लासमध्ये सोमवारी सकाळी दहा वाजता आला होता. अकरा वाजता क्लास सुटल्यानंतर तो कवलापूरला जाण्यासाठी कॉलेज कॉर्नरवरील पेट्रोल पंपासमोरील थांब्यावर गेला. साडेअकरा वाजता दुचाकीवरुन दोन संशयित चोरटे आले. त्यांनी श्रेयसला ‘कवलापूरला जाण्याचा रस्ता कुठे आहे’, अशी विचारणा केली. श्रेयसने त्यांना ‘हाच रस्ता जातो’, असे सांगितले. यावर चोरट्यांनी ‘तू कवलापूरचा आहेस काय?’ अशी विचारणा केली. श्रेयसने होय म्हणून सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी ‘चल तुला लिफ्ट देतो’, असे म्हणून त्याला दुचाकीवर बसविले.

चोरट्यांनी दुचाकी दुर्गामाता मंदिरापासून व्यंकटेश मंदिराकडे नेली. श्रेयसने ‘इकडे कुठे’, अशी विचारणा करताच चोरट्यांनी मित्राकडून पैसे घेऊन लगेच जाऊ, असे सांगितले. पण चोरट्यांनी त्याला मार्केट यार्डातून शंभर फुटी रस्त्यावरील डी मार्टजवळ नेले. तिथे एक चोरटा उतरुन निघून गेला. दुसऱ्या चोरट्याने श्रेयसला धामणी रस्त्यावर नेले. एका फायनान्स कंपनीसमोर दुचाकी थांबविली. तिथे चोरट्याने श्रेयसच्या तोंडावर ठोसा मारुन मोबाईल काढून घेतला.

चोरटा निघून गेल्यानंतर त्या परिसरातील दिलीप पाटील यांच्या मदतीने श्रेयसने घरच्यांशी संपर्क साधला. सायंकाळी त्याने वडिलांसोबत शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी या घटनेची माहिती घेऊन गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार संजय पवार व गुंडोपंत दोरकर यांनी घटनास्थळ मार्गाची पाहणी केली.दुसरी घटनादोन दिवसांपूर्वी कॉलेज कॉर्नरवर कवठेएकंद (ता. तासगाव) येथील एका तरुणास ‘लिफ्ट’ देण्याचा बहाणा करून दोन चोरट्यांनी दुचाकीवरुन धामणी रस्त्यावर नेले होते. तिथे या तरुणास मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल काढून घेतला होता. ही घटना ताजी असताना सोमवारी पुन्हा असाच प्रकार घडल्याने पोलिसांनी संशयितांच्या शोधासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी