शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर निवडणूक प्रशासनाची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 15:19 IST

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच, आता प्रशासनाने आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी नियोजन केले आहे. गेल्या काही निवडणुकांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातूून वाढत असलेली प्रचारयंत्रणा लक्षात घेता, प्रशासनानेही आता या प्रचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी व आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, यासाठी विशेष लक्ष दिले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेला प्रचार हा उमेदवारांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात येणार असल्याने उमेदवारांनाही या माध्यमातून प्रचार करताना सजग रहावे लागणार आहे.

ठळक मुद्देसोशल मीडियावर निवडणूक प्रशासनाची करडी नजरआचारसंहिता नियंत्रण कक्ष स्थापन

सांगली : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच, आता प्रशासनाने आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी नियोजन केले आहे. गेल्या काही निवडणुकांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातूून वाढत असलेली प्रचारयंत्रणा लक्षात घेता, प्रशासनानेही आता या प्रचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी व आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, यासाठी विशेष लक्ष दिले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेला प्रचार हा उमेदवारांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात येणार असल्याने उमेदवारांनाही या माध्यमातून प्रचार करताना सजग रहावे लागणार आहे.कोणतीही निवडणूक म्हटले की ध्वनिक्षेपकांच्या माध्यमातून केले जाणारे आवाहन, उमेदवारांची पायपीट आणि छोट्या-मोठ्या सभांतून प्रचाराचा धुरळा उडविला जातो. मात्र, सोशल मीडियाचे वाढते प्रस्थ लक्षात घेता, निवडणूक प्रचारासाठीही या माध्यमाचा चांगलाच वापर केला जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही सोशल मीडियावर चांगलाच प्रचार रंगला होता.शनिवारी निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करतानाच अचारसंहिता लागू केली आहे. निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतर खऱ्याअर्थाने राजकीय वातावरण तापणार आहे. त्याआधी सोशल मीडियावर प्रचारयंत्रणा कामाला लागली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मात्र, सोशल मीडियावरील प्रचारावर प्रशासनाची नजर असणार आहे. तोपर्यंतही कोणीही अफवा अथवा आरोप-प्रत्यारोप करून वातावरण दूषित करणार नाहीत, याकडे लक्ष देण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.सोशल मीडियावर बल्क मेसेज केल्यास त्याची गणना केली जाणार आहे. शिवाय प्रचारातील मुद्दा आचारसंहितेला अनुसरून आहे किंवा नाही, याचीही तपासणी करण्यात येणार आहे. या निवडणुकीचे कामकाज विधानसभा मतदारसंघनिहाय चालणार असल्याने संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भरारीपथकांची निर्मिती केली आहे.जिल्हास्तरावरून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आचारसंहिता नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यात सोशल मीडियावरील प्रचारावरही नियंत्रण ठेवण्यात येणार असल्याने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना प्रचार यंत्रणा राबविताना अधिक सजग रहावे लागणार आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाSocial Mediaसोशल मीडियाSangliसांगली