‘लोकमत’ सखी मंच २०२० वार्षिक सोडत लवकरच..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:08 IST2020-12-05T05:08:23+5:302020-12-05T05:08:23+5:30

अल्पावधितच ‘महिलांचं हक्काचं व्यासपीठ’ अशी ओळख बनलेल्या ‘लाेकमत’ सखी मंचच्या माध्यमातून दरवर्षी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. महाराष्ट्रातील ...

‘Lokmat’ Sakhi Manch 2020 to be released soon ..! | ‘लोकमत’ सखी मंच २०२० वार्षिक सोडत लवकरच..!

‘लोकमत’ सखी मंच २०२० वार्षिक सोडत लवकरच..!

अल्पावधितच ‘महिलांचं हक्काचं व्यासपीठ’ अशी ओळख बनलेल्या ‘लाेकमत’ सखी मंचच्या माध्यमातून दरवर्षी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. महाराष्ट्रातील असंख्य सखी सदस्यांचे ‘सखी मंच’ हक्काचं व्यासपीठ बनले आहे. दरवर्षाप्रमाणे यावर्षीही सखींनी नावनोंदणीला भरभरून प्रतिसाद दिला. मात्र काेराेनामुळे गेले वर्षभर जाहीर कार्यक्रमांवर मर्यादा हाेत्या. पण आपली भेट मात्र थांबली नाही. ‘लोकमत’ सखी मंच ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्यासाठी कार्यरत आहेच. सखींच्या आनंदात उणीव राहू नये, यासाठी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून विविध मनाेरंजनाचे कार्यक्रम आयाेजित करण्यात आले. यालाही माेठा प्रतिसाद मिळाला.

दरम्यान, काेराेनामुळे जाहीर कार्यक्रमांवर मर्यादा असल्याने ‘सखी मंच’ची वार्षिक साेडत हाेऊ शकली नव्हती. शिवाय लाॅकडाऊनमुळे व्यवहार बंद असल्याने सखी सदस्यांना आपले कुपन प्रायाेजकांकडे जमा करणे शक्य झाले नव्हते. परंतु आता सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. ज्या सखी सदस्यांना आपली कुपन्स अद्याप जमा करता आलेली नाहीत, त्यांनी ती ३१ डिसेंबरअखेर (सखी सदस्यांनी स्वत:) प्रायाेजकांकडे जमा करावीत. यानंतर लगेचच जानेवारी २०२१ मध्ये याचा निकाल जाहीर करण्यात येईल. आपल्या वार्षिक बक्षीस योजनेचे विजेते कोण? हे जाणून घेण्याची संधी एका विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्यासमाेर येईल.

‘२०२१’ ची सभासद नोंदणी लवकरच सुरू होणार... महिलांच्या अभिव्यक्तीला व्यासपीठ देणाऱ्या ‘सखी मंच’च्या माध्यमातून वर्षभर विविध बहारदार कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात येते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ सखी मंच ऑनलाईनच्या माध्यमातून आपण संपर्कात हाेताेच. त्याच उत्साहात आता लवकरच नवीन वर्षात सर्व सखी पुन्हा प्रत्यक्ष भेटणार आहोत. अधिक माहितीसाठी संपर्क : अर्चना : ९०२८४४७९४७, प्रशांत : ९१६८३६८२७७

चौकट

बक्षीस योजना प्रायोजक...

सह्याद्री स्मार्ट आटाचक्की

राज अबॅकस एज्युकेशन अकॅडमी

व्हिजन कम्प्युटर इन्स्टिट्यूट

साई सेल्स

येस इन्व्हेस्टमेंट

श्री स्वामी समर्थ ऑप्टीकल्स

रिद्धी टेलर्स

अनिकेत केमिकल कंपनी

Web Title: ‘Lokmat’ Sakhi Manch 2020 to be released soon ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.