‘लोकमत’तर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांचा स्नेहमेळावा

By Admin | Updated: August 4, 2015 00:06 IST2015-08-03T23:55:10+5:302015-08-04T00:06:33+5:30

सांगलीत बुधवारी कार्यक्रम : ‘जिंदगी एक सफर’, ‘डान्स धमाका’चे आयोजन

'Lokmat' newsletter sellers get together | ‘लोकमत’तर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांचा स्नेहमेळावा

‘लोकमत’तर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांचा स्नेहमेळावा

सांगली : आयुष्यातील अनेक वर्षे वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करून सामाजिक योगदान देणाऱ्या जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा मेळावा येत्या ५ आॅगस्ट रोजी ‘लोकमत’च्यावतीने आयोजित केला आहे. यावेळी ज्येष्ठ विक्रेत्यांच्या सत्कार सोहळ्याबरोबरच ‘जिंदगी एक सफर’, ‘डान्स धमाका’ अशा विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.
सांगलीच्या वृत्तपत्र इतिहासात प्रथमच विक्रेत्यांसाठीचा अनोखा उपक्रम ‘लोकमत’तर्फे राबविण्यात येत आहे. सांगलीतील भावे नाट्यगृहात ५ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील ४0 ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार करतानाच, सन्मानपत्राने त्यांना गौरविण्यात येणार आहे. विक्रेते व त्यांच्या कुटुंबियांसाठी ‘सा रे ग म’फेम गायक मिलिंद कुलकर्णी यांचा ‘जिंदगी एक सफर’ हा हिंदी, मराठी गाण्यांचा कार्यक्रम, तसेच ‘डान्स धमाका’ आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव ऊर्फ पप्पू राजाराम डोंगरे हे प्रायोजक आहेत. जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’ परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)


विक्रेत्यांच्या गुणवंत मुलांना शिष्यवृत्ती
वृत्तपत्र विक्रीचा कष्टाचा व्यवसाय करीत आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्नही सर्वच विक्रेते करीत असतात. त्यामुळे त्यांच्या मुलांना प्रोत्साहन देण्याच्यादृष्टीने ‘लोकमत’तर्फे विक्रेत्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. ज्या वृत्तपत्र विक्रेत्यांची मुले बारावी उत्तीर्ण होऊन पदवीचे शिक्षण घेत आहेत, त्यांनी संबंधित मुलांच्या महाविद्यालयीन ओळखपत्राची झेरॉक्स प्रत ‘लोकमत’ कार्यालयात जमा करावी. जमा होणाऱ्या अशा सर्व ओळखपत्रांमधून सोडत पद्धतीने (लकी ड्रॉ) शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात येणार आहे.


‘प्यारी जोडी’
वृत्तपत्र विक्रीच्या व्यवसायात काम करताना अनेकांनी मैत्रीचे अतूट धागेही गुंफले आहेत. कोणत्याही वृत्तपत्रासाठी काम करताना एकत्रितपणे राबणाऱ्या जिल्ह्यातील १६ जिवलग मित्रांच्या सत्काराचा कार्यक्रमही यावेळी होणार आहे.

Web Title: 'Lokmat' newsletter sellers get together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.