शनिवारी लोकन्यायालयाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:10 IST2020-12-05T05:10:20+5:302020-12-05T05:10:20+5:30

सांगली : जिल्हा व सत्र न्यायालय तसेच सर्व तालुक्यांतील न्यायालये, औद्योगिक व कामगार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय व सहकार न्यायालयात ...

The Lok Sabha will be held on Saturday | शनिवारी लोकन्यायालयाचे आयोजन

शनिवारी लोकन्यायालयाचे आयोजन

सांगली : जिल्हा व सत्र न्यायालय तसेच सर्व तालुक्यांतील न्यायालये, औद्योगिक व

कामगार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय व सहकार न्यायालयात शनिवारी (दि. १२) सकाळी

१०.३० वाजता लोक न्यायालय आयोजित केले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव

न्यायाधीश विश्वास माने यांनी ही माहिती दिली. तडजोड पात्र फौजदारी, दिवाणी,

कौटुंबिक वादासंबंधीची, कामगार वादाची, भू-संपादनाची, वाहन अपघात नुकसानभरपाईची, कौटुंबिक

हिंसाचाराची, चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम १३८ खालील प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणात बँक,

दूरसंचार, वीजबिल, घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची प्रकरणे या लोकन्यायालयासमोर ठेवता येतील.

-------

Web Title: The Lok Sabha will be held on Saturday