शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

Lok Sabha Election 2019 लोकसभेच्या मैदानावर अस्तित्वाचीच तालीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 17:19 IST

हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या मैदानावर स्वाभिमानी आणि शिवसेना यांच्यातील लढतीला रंगत येऊ लागली आहे. ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी यांच्यासाठी वाळवा-शिराळ्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी सर्व जबाबदारी

ठळक मुद्देइस्लामपूर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीनंतर विस्कटलेली विकास आघाडी पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेसाठी एकत्र

अशोक पाटीलइस्लामपूर : हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या मैदानावर स्वाभिमानी आणि शिवसेना यांच्यातील लढतीला रंगत येऊ लागली आहे. ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी यांच्यासाठी वाळवा-शिराळ्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी सर्व   जबाबदारी घेतली आहे. विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र  आलेले दुसºया फळीतील नेते अस्तित्वासाठी शिवसेनेच्या प्रचारासाठी मंचावर दिसत आहेत. परंतु त्यांच्या पोटात  एक अन् ओठात एक असल्याचे कार्यकर्त्यांतून बोलले जात आहे.

इस्लामपूर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीनंतर विस्कटलेली विकास आघाडी पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेसाठी एकत्र आली आहे. यामध्ये रयत क्रांती संघटनेचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, हुतात्मा संकुलाचे नेते गौरव नायकवडी, भाजपचे विक्रम पाटील, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, आष्ट्याचे वैभव शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील यांचा समावेश आहे. या सर्वांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या बरोबरीने काम सुरू केले आहे. परंतु यातील अनेकजण राजकीय अस्तित्वासाठी एकमेकांवरच कुरघोड्या करत आहेत. 

राष्ट्रवादीने शेट्टी यांच्यासाठी जोरदारपणे प्रचार सुरू ठेवला आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील यांना राज्यभर फिरावे लागत असले तरी, त्यांचे प्रमुख कार्यकर्ते प्रचाराची यंत्रणा राबवत आहेत. शिराळ्यातही माजी आ. मानसिंगराव नाईक यांनी दररोज चार-पाच सभा घेऊन प्रचारात रंगत आणली आहे. त्यांना काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांची साथ आहे.याउलट वाळवा तालुक्यातील काँग्रेसची अवस्था बिकट आहे.  जिल्हा परिषदेचे सदस्य व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी आघाडीच्या धर्माला वाटाण्याच्या अक्षता लावत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. सी. बी. पाटील, त्यांचे पुत्र जयराज पाटील यांनीही वेगळी भूमिका घेतली आहे. महिला काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा अ‍ॅड. मनीषा रोटे यांनी मात्र जिल्हाभर महिला मेळावे भरवून राजू शेट्टी यांची बॅट हातात घेतली  आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSangliसांगली