शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

दादांच्या वारसदारांनीच सर्व संस्था बुडविल्या - संजयकाका पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 18:15 IST

वसंतदादा पाटील यांच्या नावाने मते मागणाऱ्या त्यांच्या वारसदारांनी त्यांच्या नावाच्या संस्थाच बुडविल्या. त्यामुळे ते कोणत्या अधिकाराने मते मागत आहेत, असा सवाल खासदार संजयकाका पाटील यांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्दे'वसंतदादा पाटील यांच्या नावाने मते मागणाऱ्या त्यांच्या वारसदारांनी त्यांच्या नावाच्या संस्थाच बुडविल्या. त्यामुळे ते कोणत्या अधिकाराने मते मागत आहेत.'भाजपाचे खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ येथील मारुती चौकात सभा पार पडली.विशाल पाटील हे दादांचा नातू म्हणून मते मागत आहेत. त्यांनी कारखाना चालवायला दिला, पण कामगारांना देशोधडीला लावले.

सांगली -  वसंतदादा पाटील यांच्या नावाने मते मागणाऱ्या त्यांच्या वारसदारांनी त्यांच्या नावाच्या संस्थाच बुडविल्या. त्यामुळे ते कोणत्या अधिकाराने मते मागत आहेत, असा सवाल खासदार संजयकाका पाटील यांनी उपस्थित केला आहे.

भाजपाचे खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ येथील मारुती चौकात सभा पार पडली. यावेळी पाटील बोलत होते. ते म्हणाले की, वसंतदादा कारखाना चालवायला देऊन अभिमान बाळगणाऱ्या विशाल पाटील यांच्या घरात ११ वेळा खासदारकी मिळाली. पण त्यांनी सांगलीसह जिल्ह्यासाठी, सर्वसामान्य जनतेसाठी काय केले? कोणते प्रश्न मार्गी लावले? 

विशाल पाटील हे दादांचा नातू म्हणून मते मागत आहेत. त्यांनी कारखाना चालवायला दिला, पण कामगारांना देशोधडीला लावले. कामगारांचे भविष्य निर्वाह निधीसह अनेक देणी दिलेली नाहीत. कामगारांना टाचा घासून मरण्याची वेळ आली आहे. दुसरीकडील उमेदवार हे  जातीच्या आधारावर निवडणुकीत उतरले आहेत. त्यांचा पूर्वइतिहास वेगळा होता, आता ते एमआयएमचे ओवेसी यांच्या नावे लढत आहेत. ओवेसींचा जातीधर्माचा विखारी चेहरा संसदेत अनुभवला आहे. या लोकांची महत्त्वाकांक्षा ही राक्षसी स्वरुपाची आहे.

पृथ्वीराज देशमुख म्हणाले, भाजपाने जिल्ह्यात सर्वत्र यश मिळविले. अनेक संस्था काबीज केल्या. तरी पक्षाचे वृक्ष लावणारे संभाजी पवार यांची उणीव होती. त्यांच्या पाठबळामुळे आता संजय पाटील यांना जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य मिळेल. गौतम पवार म्हणाले, काँग्रेसविरोधात पूर्वीपासून संभाजी पवार यांनी आवाज उठविला. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या सभा याच मारुती चौकात झाल्या आणि यशही आले आहे. आजही या सभेचा संकेत तोच आहे. सभेस माजी आमदार नितीन शिंदे, भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, मकरंद देशपांडे, पृथ्वीराज पवार, जिल्हा परिषद सदस्य डी. के. पाटील, रमेश भाकरे, सुरेश आवटी उपस्थित होते.

काँग्रेसनेच सांगली काँग्रेसमुक्त केली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आम्ही नेहमी काँग्रेसी विचारांपासून मुक्त भारताचा निर्धार करीत होतो; मात्र सांगलीतील काँग्रेस नेत्यांनी एकमेकांची जिरवाजिरवी करण्याच्या प्रयत्नात पक्षाची जिरवून हा जिल्हा काँग्रेसमुक्त केला, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेत केली आहे. महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ येथील स्टेशन चौकात रविवारी सभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार संभाजी पवार,  नितीन शिंदे, भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, पृथ्वीराज देशमुख, शिवसेनेचे नेते गौतम पवार आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :BJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsangli-pcसांगली