शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

लोढे तलाव बारमाही करणार -सहा गावांचे शेतकरी एकत्र : बारा लाख भरले; विसापूर-पुणदी योजनेचे पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 21:52 IST

मांजर्डे : लोढे तलावामध्ये विसापूर-पुणदी उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडून तलाव बारमाही करण्यासाठी ६ गावांतील शेतकºयांनी एकत्रित येऊन पाटबंधारे विभागाकडे १२ लाख रुपये जमा

मांजर्डे : लोढे तलावामध्ये विसापूर-पुणदी उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडून तलाव बारमाही करण्यासाठी ६ गावांतील शेतकºयांनी एकत्रित येऊन पाटबंधारे विभागाकडे १२ लाख रुपये जमा केले व योजना सुरू झाल्यानंतर उर्वरित रक्कम जमा करण्याचे ठरले.

आरवडे (ता. तासगाव) येथील सिद्धेश्वर मंदिरात लोढे तलाव बारमाही करण्यासाठी पूर्वभागातील गावातील शेतकºयांची बैठक पार पडली होती. बैठकीला आरवडे, डोर्ली, कौलगे, सावर्डे, लोढे या गावांतील शेतकरी उपस्थित होते.

लोढे तलाव तासगाव पूर्व भागातील मोठा तलाव आहे. या तलावाची पाणी साठवण क्षमता १६३ दशलक्ष घनफूट आहे. या तलावावर या परिसरातील आरवडे, लोढे, कौलगे, सावर्डे, डोर्ली, चिंचणी या गावांच्या शेतीचे व पिण्याच्या पाण्याचे भवितव्य अवलंबून आहे. बरीच वर्षे या दुष्काळी पट्ट्यात समाधानकारक पाऊस नसल्याने हा तलाव मागील बरीच वर्षे पूर्ण क्षमतेने भरला नव्हता. परिणामी तलावाच्या परिसरातील बागायती शेती उद्ध्वस्त झाली आहे. हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला तर या भागातील शेतीला वर्षभर फायदा होतो. येथून पेयजल योजनेद्वारे पाच गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाºया स्वतंत्र पाणीयोजना आहेत. शेतीच्या पाण्यासाठी एकूण १६४ स्वतंत्र पाईपलाइन शेतकºयांनी स्वखर्चाने केल्या आहेत. त्यासाठी शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. परंतु त्याचा शेतीसाठी पुरेसा फायदा झाला नाही. मागील २० वर्षांत पावसाच्या पाण्याने दोनवेळा तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. त्यामुळे शेतकºयांनी गुंतवलेले कोट्यवधी रुपये वाया गेले आहेत.

चार वर्षांपूर्वी दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या प्रयत्नातून विसापूर-पुणदी उपसा सिंचन पाणीयोजना अस्तित्वात आली. या योजनेतून शासनाच्या माध्यमातून हा तलाव भरला जाईल, अशी शेतकºयांना आशा होती; परंतु या योजनेतून आतापर्यंत या तलावात ४० दशलक्ष घनफूट पाणी केवळ पिण्यासाठी आले आहे. त्यामुळे या भागातील शेतकºयांनी कोणत्याही राजकीय नेत्यावर विसंबून न राहता एकत्रित येऊन शासनाच्या नियमानुसार प्रतिदशलक्ष घनफूट ४२,८०० रुपये भरून हा तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्यायचा, असे या बैठकीत ठरवले. यावेळी प्रति शेतीपंप ३० हजार रुपयाप्रमाणे पैसे जमा करण्यास सर्व शेतकºयांनी होकार दिला व आठ दिवसात सर्वांनी पैसे जमा करून लवकरात लवकर तलाव भरून घ्यायचे सर्वानुमते ठरले.पंधरा दिवसांत योजना सुरू होणारपुणदी सिंचन योजनेचे अभियंता एस. एस. रासनकार म्हणाले की, १५ दिवसात पाणीयोजना सुरू होईल व शेतकºयांनी शासन नियमनुसार पैसे भरले, तर तलावात पाणी सोडण्यास काही अडचण येणार नाही. शेतकºयांनी पैसे भरून सहकार्य करावे. आमच्या विभागाकडून सर्वतोपरी आम्ही मदत करू. 

एकजुटीचे प्रयत्नराजकारण बाजूला ठेवून लोढे तलाव बारमाही करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया. लोढे तलाव बारमाही झाला तरच बागायती शेती जिवंत राहील, अशा प्रतिक्रिया बैठकीत व्यक्त झाल्या.

टॅग्स :WaterपाणीSangliसांगली