लॉकडाऊनच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:22 IST2021-05-30T04:22:46+5:302021-05-30T04:22:46+5:30
काटेकोर अंमलबाजावणी करा कडेगाव : कोविड रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनच्या कडक निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करा. ज्या गावांमध्ये सक्रिय ...

लॉकडाऊनच्या
काटेकोर अंमलबाजावणी करा
कडेगाव :
कोविड रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनच्या
कडक निर्बंधांची काटेकोर
अंमलबजावणी करा. ज्या गावांमध्ये सक्रिय रुग्णसंख्या जास्त आहे।
त्या गावांमध्ये पोलीस प्रशासनाने
अधिक लक्ष देऊन नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रशासकीय
अधिकाऱ्यांना दिल्या.
कडेगाव येथील तहसीलदार कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत
पालकमंत्री पाटील बोलत होते.
यावेळी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार मोहनराव कदम, आमदार अरुण लाड, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी,
मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी
उपस्थित होते.
प्रांताधिकारी डॉ. गणेश मरकड व तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांनी उपाययोजनांबाबत
माहिती दिली.
जयंत पाटील
म्हणाले की, होम आयसोलेशनमध्ये असतानाही नियमांचे पालन न करणे यामुळे रुग्ण संख्या वाढते. यावर उपाययोजना म्हणून कडेगाव तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये लोकसहभागातून संस्थात्मक विलगीकरण केंद्र सुरू केली आहेत.
यावेळी गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशा चौगुले, कडेगावच्या नगराध्यक्षा संगीता राऊत, मुख्याधिकारी कपिल जगताप, कार्यकारी अभियंता राजन डवरी, इंद्रजित साळुंखे,
जयदीप यादव, विजय शिंदे उपस्थित होते.
चौकट
लसीकरणाचे योग्य नियोजन करा
तालुक्यातील सर्व लसीकरण
केंद्रांनी उपलब्धतेनुसार लसीकरणाचे योग्य नियोजन करावे. चाचणीस विलंब झाल्यास धोका वाढतो
म्हणून लक्षणे दिसताच तात्काळ चाचणी करण्याबाबत नागरिकांत जागृती करावी, असे जयंत पाटील म्हणाले.