शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 21:36 IST

सांगली कुपवाडजवळ बेकायदा विदेशी दारू, बीअरची वाहतूक करणारा टेम्पो स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पकडला.

सांगली कुपवाडजवळ बेकायदा विदेशी दारू, बीअरची वाहतूक करणारा टेम्पो स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पकडला. यावेळी ११ लाख ७९ हजारांचा दारूसाठ, टेम्पो असा १६ लाख ७९ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी अक्षय प्रदीप वाघमारे (वय २०, रा. मुलाणकी वस्ती, आटपाडी), नानासाहेब आनंदा पाटील (वय ५१, रा. पाटील मळा, आटपाडी) या दोघांना अटक करण्यात आली.

स्थानिक गुन्हे अन्वेषणकडील सहायक निरीक्षक जयदीप कळेकर व सहायक फौजदार अनिल ऐनापुरे, अतुल माने, रणजित जाधव यांना दि. २० रोजी अक्षय वाघमारे हा टेम्पो (एमएच १० डीटी ७२०५) मधून विदेशी दारू घेऊन कुपवाडजवळील तासगाव फाटा, कुमठे फाटा या मार्गाने जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने कुपवाडजवळ थांबून वाहनांची पाहणी सुरू ठेवली. तेवढ्यात पांढऱ्या रंगाचा टेम्पो आल्यानंतर तो अडवला. चालक अक्षय वाघमारे व शेजारी बसलेल्या नानासाहेब पाटील या दोघांना ताब्यात घेतले. टेम्पोची झडती घेतली. तेव्हा मागील हौद्यात विदेशी दारू व बीअरचे बॉक्स आढळून आले. दारूसाठ्याबाबत चौकशी केल्यानंतर दोघांकडे परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. माल कोठून आणला असे विचारता, मिरज येथील संगम वाइन शॉपमधून घेऊन आटपाडी येथे जात असल्याचे सांगितले. पोलिसांनी पंचांसमक्ष ११ लाख ७९ हजार ५०० रुपयांचा दारूसाठा, पाच लाखांचा टेम्पो असा १६ लाख ७९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोघांना मुद्देमालासह कुपवाड पोलिसांच्या ताब्यात दिले.पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक कळेकर, अंमलदार संकेत मगदूम, आमसिद्ध खोत, इम्रान मुल्ला, अमोल ऐदाळे, अनंत कुडाळकर, सोमनाथ पतंगे, रोहन घस्ते, सुशांत चिले यांच्या पथकाने कारवाई केली.

बेकायदा विक्रीसाठी वाहतूकमिरजेतून विनापरवाना पावणेबारा लाखांची दारू आटपाडी परिसरात नेऊन ती बेकायदा विक्री केली जाणार होती. पोलिसांच्या सतर्कतेमुळे ती पकडली गेली. विनापरवाना दारू पुरवणाऱ्या वाइन शॉप मालकाची या प्रकरणात चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी