तानंगमध्ये दारू विकणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:26 IST2021-05-16T04:26:17+5:302021-05-16T04:26:17+5:30

कुपवाड : मिरज-तासगाव रस्त्यालगत असलेल्या हाॅटेलसमोर विदेशी दारूची विक्री करीत असताना तरुणास कुपवाड पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्याजवळील ६० हजार ...

Liquor seller arrested in Tanang | तानंगमध्ये दारू विकणाऱ्यास अटक

तानंगमध्ये दारू विकणाऱ्यास अटक

कुपवाड : मिरज-तासगाव रस्त्यालगत असलेल्या हाॅटेलसमोर विदेशी दारूची विक्री करीत असताना तरुणास कुपवाड पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्याजवळील ६० हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

रियाज सिराज पिरजादे (वय ३४, खोत वस्ती, सावळी), असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मद्यविक्रीही बंद करण्यात आली आहे. मिरज-तासगाव रस्त्यालगत असलेल्या हॉटेलजवळ देशी-विदेशी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती कुपवाड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांकडून छापा टाकण्यात आला. संशयित रियाज पिरजादे दारूची विक्री करीत असताना रंगेहात सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्यांच्या जवळील ६० हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Web Title: Liquor seller arrested in Tanang