लायन्स नॅब हॉस्पिटलतर्फे नेत्रदात्यांच्या नातेवाइकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:31 IST2021-09-05T04:31:27+5:302021-09-05T04:31:27+5:30
वैद्यकीय संचालिका डॉ. विजयालक्ष्मी ऐनापुरे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुखे व जिल्हा नेत्र शल्य ...

लायन्स नॅब हॉस्पिटलतर्फे नेत्रदात्यांच्या नातेवाइकांचा सन्मान
वैद्यकीय संचालिका डॉ. विजयालक्ष्मी ऐनापुरे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुखे व जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील यांच्या हस्ते नेत्रदाते ज्योती पटवर्धन, मीराबाई मेघानी, पुतळाबाई जाधव, कुमारपाल शहा, प्रतिभा वैद्य, द्रौपदी धेंडे, सुमन लेले यांच्या नातेवाइकांचा सत्कार करण्यात आला. नेत्रदात्यांचे नातेवाईक महेश पटवर्धन व दयानंद कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. आतापर्यंत लायन्स नॅब नेत्र रुग्णालयात ३४५१ जणांनी मरणोत्तर नेत्रदान केले आहे. २५७८ गरजूंना नेत्ररोपण करून दृष्टी मिळवून देण्यात आली आहे. यावेळी नोडल अधिकारी जगन्नाथ बाबर, अविनाश शिंदे, रुग्णालयाचे कार्यकारी विश्वस्त चंद्रकांत पाटील, डॉ. एस. जी. हेरेकर, राजेंद्र जगदाळे, नंदकुमार सुतार, विजय पवार, किरण जाधव, विवेक पाटील उपस्थित होते. थाॅमस मोरे यांनी सूत्रसंचालन केले.