लिंगनूर ग्रामपंचायतीतर्फे शिक्षकांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:30 IST2021-09-06T04:30:44+5:302021-09-06T04:30:44+5:30

फोटो-०५लिंगनूर१ लिंगनूर : लिंगनूर (ता. मिरज) येथे शिक्षक दिनानिमित्त लिंगनूर ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील आजी-माजी शिक्षक यांचा सन्मान करण्यात ...

Lingnur Gram Panchayat honors teachers | लिंगनूर ग्रामपंचायतीतर्फे शिक्षकांचा सन्मान

लिंगनूर ग्रामपंचायतीतर्फे शिक्षकांचा सन्मान

फोटो-०५लिंगनूर१

लिंगनूर : लिंगनूर (ता. मिरज) येथे शिक्षक दिनानिमित्त लिंगनूर ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील आजी-माजी शिक्षक यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सेवाश्रम विद्यालय लिंगनूर व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला.

प्रवीण जगताप मनोगतात म्हणाले, शिक्षकाने विद्यार्थीप्रधान असावे, विद्यार्थ्याने शिक्षकप्रधान असावे. विद्यार्थी व शिक्षक दोघे ज्ञानप्रधान असावेत आणि ज्ञान हे सेवाप्रधान असावे. ज्ञानाचा उपयोग सेवेसाठी व्हावा.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सेवाश्रम विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक जी. एस. पाटील, जी. आर. जगताप, के. एस. पाटील, सरपंच मारुती पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नंदकुमार नलावडे, राजू मगदूम, दादू मगदूम, अशोक मगदूम, कुमार बनसोडे, रवींद्र नाईक, संजय पाटील, मुख्याध्यापक महादेव चौगुले, मुख्याध्यापक हणमंत आरगे उपस्थित होते. अशोक कोपर्डे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Lingnur Gram Panchayat honors teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.