मेणी येथे दीपमाळेचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:30 IST2021-09-05T04:30:42+5:302021-09-05T04:30:42+5:30
कोकरुड : मेणी (ता. शिराळा) येथील निनाईदेवी मंदिरासमोर लोकवर्गणीतून करण्यात येणाऱ्या दीपमाळेचे भूमिपूजन यात्रा कमिटीच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ...

मेणी येथे दीपमाळेचे पूजन
कोकरुड : मेणी (ता. शिराळा) येथील निनाईदेवी मंदिरासमोर लोकवर्गणीतून करण्यात येणाऱ्या दीपमाळेचे भूमिपूजन यात्रा कमिटीच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मेणी यात्रा कमिटी अध्यक्ष संजय शिरसट म्हणाले, गेल्या वर्षापासून निनाई मंदिराच्या आवारात दीपमाळ असावी, अशी मागणी देवीच्या भक्तांतून तसेच ग्रामस्थांतून होत होती. गतवर्षी जानेवारीमध्ये झालेल्या यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांच्या बैठकीत दीपमाळ उभारण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले होते. अनेक देणगीदारांच्या देणगीतून दोन लाख रुपये जमा केले आहे. दीपमाळेच्या भूमिपूजनप्रसंगी यात्रा कमिटी अध्यक्ष संजय शिरसट, खजिनदार पोपट सावंत, युवानेते मनोज चिंचोलकर, सरपंच आनंदा सुतार, संजीव शिरसट, माजी सरपंच आबा पाटील, संजय बेंगडे, गणपती गुरव, शामराव पाटील, सचिव बाबा बेंगडे, रामचंद्र इंगळे, खाशाबा पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.