दुसऱ्यासाठी जगणाऱ्याचे जीवन आपाेआपच समृध्द हाेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:24 IST2021-02-05T07:24:08+5:302021-02-05T07:24:08+5:30

दूधगाव (ता. मिरज) येथे वीर सेवा दलाच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बाेलत हाेते. देशमुख म्हणाले की, ...

The life of one who lives for another is automatically enriched | दुसऱ्यासाठी जगणाऱ्याचे जीवन आपाेआपच समृध्द हाेते

दुसऱ्यासाठी जगणाऱ्याचे जीवन आपाेआपच समृध्द हाेते

दूधगाव (ता. मिरज) येथे वीर सेवा दलाच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बाेलत हाेते. देशमुख म्हणाले की, संघटन आणि संघटना यामध्ये फरक आहे. संघटन म्हणजे चळवळ आहे. सर्वांना संघटित करून विकास करणे, सर्वांना बरोबर घेऊन काम करणारी संघटना टिकते. वीर सेवा दलाने वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या आदर्शाप्रमाणे वाटचाल करीत सेवाभावी वृत्तीने काम केले आहे. महापूर, कोरोना संकटाच्या काळातही चांगले काम करून समाजाची सेवा केली. त्यांचे कार्य समाजास प्रेरक आहे.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते रावसाहेब पाटील (दादा) यांना दानचिंतामणी पदवी व शकुंतला बाबासाहेब पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच वीराचार्य स्मृती ग्रंथ प्रकाशन, आदर्श पाठशाळा शिक्षक सन्मान, विविध शाखांना कार्याप्रती कृतज्ञता प्रेरणा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. भूपाल गिरमल यांनी स्वागत केले. शशिकांत राजोबा यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.

सोहळ्यास दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, अध्यक्ष रावसाहेब पाटील, उपाध्यक्ष दत्ता डोर्ले, मुख्य महामंत्री डॉ. अजित पाटील, खजिनदार संजय शेटे, सहखजिनदार पा.पा. पाटील, वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष शशिकांत राजोबा, उपाध्यक्ष भूपाल गिरमल, सचिव एन. जे. पाटील, प्राचार्य श्रीधर हेरवाडे, जिल्हा परिषद सदस्या सुरेखा आडमुठे, मीनाक्षी पाटील, सरपंच विकास कदम, श्रीकांत पाटील, बबन थोटे, विजय आवटी, सुभाष मगदूम, अनिल भोकरे, राजेंद्र नांदणे, सुनील पाटील, डी. के.पाटील, अनिल मडके, जयकुमार बेले, दिलीप देसावळे आदी उपस्थित होते. संयोजन वीर सेवा दल व शाळा समितीचे सदस्य यांनी केले.

फोटो : २७ दूधगाव १

ओळ : दूधगाव (ता. मिरज) येथे वीर सेवा दलाच्या वर्धापन सोहळ्यात इंद्रजित देशमुख यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शशिकांत राजोबा, प्रा. डी. ए. पाटील, भुपाल गिरमल, एन. जे. पाटील उपस्थित हाेते.

Web Title: The life of one who lives for another is automatically enriched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.