विलासराव पाटील यांचे कार्य पुढे नेऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:32 IST2021-09-10T04:32:49+5:302021-09-10T04:32:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मांगले : वारणा दूध संघाचे माजी अध्यक्ष व मांगले (ता. शिराळा) येथील मोरणा विविध उद्योग समूहाचे ...

Let's take the work of Vilasrao Patil forward | विलासराव पाटील यांचे कार्य पुढे नेऊ

विलासराव पाटील यांचे कार्य पुढे नेऊ

लोकमत न्यूज नेटवर्क

मांगले : वारणा दूध संघाचे माजी अध्यक्ष व मांगले (ता. शिराळा) येथील मोरणा विविध उद्योग समूहाचे संस्थापक विलासराव यशवंतराव पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या तैलचित्राचे अनावरण सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमरसिंह नाईक यांच्या हस्ते झाले. वारणा उद्योग समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, आमदार मानसिंगराव नाईक यांनी विलासराव पाटील यांना अभिवादन केले. विलासराव पाटील यांचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल, अशी भावना यावेळी काेरे व नाईक यांनी व्यक्त केल्या.

मोरणा सहकारी दूध संस्थेच्या दालनात बसवलेल्या तैलचित्राच्या अनावरणप्रसंगी युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, आमदार विनय कोरे, पन्हाळा पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र जाधव, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच.आर. जाधव, वारणा बॅंकेचे संचालक अभिजित पाटील, वारणा दूध संघ कार्यकारी संचालक मोहन येडूरकर, वारणा दूध संचालक अभिजित पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव कदम, जयसिंगराव शिंदे, डॉ. प्रताप पाटील, राजेंद्र नाईक, माजी उपसभापती समाटसिंह नाईक, ‘विश्वास’चे माजी संचालक जयवंत पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Let's take the work of Vilasrao Patil forward