राष्ट्रवादी पक्ष मजबूत करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:18 IST2021-07-08T04:18:07+5:302021-07-08T04:18:07+5:30
बहे (ता. वाळवा) येथे अशोकराव देशमुख यांच्या हस्ते विराज नाईक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विठ्ठलराव पाटील, शिवाजीराव पाटील, ...

राष्ट्रवादी पक्ष मजबूत करू
बहे (ता. वाळवा) येथे अशोकराव देशमुख यांच्या हस्ते विराज नाईक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विठ्ठलराव पाटील, शिवाजीराव पाटील, जयदीप पाटील, कालिदास पाटील, सर्जेराव दमामे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरटे : तालुक्याचे युवक नेते प्रतीक पाटील यांच्यासमवेत जिल्हाभर दौरा करुन राष्ट्रवादी पक्ष मजबूत करु. जत, आटपाडी, मिरज येथे पक्षीय काम करण्यास वाव असून, या परिसरात पक्ष सक्षम झाला तरच झालेली निवड सार्थकी ठरेल, असा विश्वास जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष विराज नाईक यांनी व्यक्त केला.
बहे (ता. वाळवा) येथे बहे विकास सोसायटीतर्फे आयोजित सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव देशमुख, उपाध्यक्ष नामदेव कारंडे व संचालकांच्या हस्ते नाईक यांचा सत्कार करण्यात आला.
राजारामबापू कारखान्याचे संचालक विठ्ठलराव पाटील यांनी स्वागत केले. संचालक दिनकर पाटील यांनी आभार मानले. यावेळी शिवाजीराव पाटील, कृष्णराव पाटील, सर्जेराव दमामे, अमरसिंह थोरात, शिवाजी पाटील, रोहित तोरस्कर, लालासो देशमुख, कालिदास पाटील, जयदीप पाटील, सयाजी पाटील उपस्थित होते.