भूखंड हडपण्याचा डाव हाणून पाडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:39 IST2020-12-13T04:39:58+5:302020-12-13T04:39:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिका क्षेत्रातील भूखंड हडप करण्याचा डाव विविध माध्यमातून हाणून पाडू, असा निर्धार शनिवारी सांगलीच्या ...

Let's make a plot to grab the plot | भूखंड हडपण्याचा डाव हाणून पाडू

भूखंड हडपण्याचा डाव हाणून पाडू

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापालिका क्षेत्रातील भूखंड हडप करण्याचा डाव विविध माध्यमातून हाणून पाडू, असा निर्धार शनिवारी सांगलीच्या सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला. याप्रश्नी मंगळवारी १५ फेब्रुवारीस महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

कष्टकऱ्यांची दौलत येथे सर्वपक्षीय कृती समितीची बैठक पार पडली. बैठकीला नागरिक हक्क संघटनेचे वि. द. बर्वे, माजी नगरसेवक हणमंत पवार, कॉ. शंकर पुजारी, स्वाभिमानी शेतकरी संघटने जिल्हाध्यक्ष महेश खराडे, मनसेचे सचिव आशिष कोरी, डॉ. संजय पाटील, उमेश देशमुख, राजकुमार राठोड, राहुल पाटील, तोहिद शेख, तानाजी रुईकर, माजी नगरसेवक शेरू सौदागर, लालू मिस्त्री, किरणराज कांबळे, अविनाश जाधव, संतोष कदम आदी उपस्थित होते.

महापालिकेतील लुटारुंची साखळी व भूखंड माफियांविरोधात रस्त्यावरची तसेच कायदेशीर लढाई उभी करण्यात येईल, असा इशारा समितीचे निमंत्रक सतीश साखळकर, युवा नेते गौतम पवार यांनी दिला. येत्या गुरुवारी १७ डिसेंबर रोजी होणारी ऑनलाईन महासभा रद्द करून ती महापालिकेत थेट घ्यावी, अशी मागणी सदस्यांनी केली.

साखळकर म्हणाले, महापालिकेत आरक्षणे उठविणे आणि भूखंड कवडीमोल दराने भाड्याने देऊन लुटीचा सपाटा सुरू केला आहे. यासाठी अशापद्धतीचे ठराव महासभेच्या इतिवृत्तात घुसडण्यात आले आहेत. अगोदरच विकास आराखडा भकास झाला आहे. आता पुन्हा आरक्षणे उठवून शहराची वाट लावण्याचे प्रकार सुरू आहेत. हे प्रयत्न आम्ही उधळून लावू.

गौतम पवार म्हणाले, महापालिकेत सध्या अनागोंदी सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असूनू, सत्ताधारी नेत्यांनीही याकडे दुर्लक्ष केले आहे.

चौकट

कायदेशीर लढाई लढू

हणमंत पवार म्हणाले, हा भूखंड बाजार बिनबोभाट पार पाडण्यासाठी ऑनलाईन सभेचा फंडा सुरू आहे. त्यामुळे तो रोखण्यासाठी आता कायदेशीर लढाई उभारावी लागेल.

Web Title: Let's make a plot to grab the plot