जिल्ह्यात शिवसेनेला गतवैभव मिळवून देऊ या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:19 IST2021-07-21T04:19:22+5:302021-07-21T04:19:22+5:30

बुधगाव : बुधगावासह जिल्ह्यात शिवसेनेला गतवैभव मिळवून देण्यासाठी बुधगावमधील शिवसैनिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते ...

Let's give Shiv Sena past glory in the district | जिल्ह्यात शिवसेनेला गतवैभव मिळवून देऊ या

जिल्ह्यात शिवसेनेला गतवैभव मिळवून देऊ या

बुधगाव : बुधगावासह जिल्ह्यात शिवसेनेला गतवैभव मिळवून देण्यासाठी बुधगावमधील शिवसैनिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी केले.

बुधगाव (ता. मिरज) येथे शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमात शिवसेना जिल्हा संघटक बजरंग पाटील, दिगंबर जाधव, मिरज तालुका संपर्कप्रमुख राम सावंत, उपजिल्हा प्रमुख शंभोराज काटकर, युवासेना जिल्हा प्रमुख रणजित जाधव, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सुजाता इंगळे, सांगली (ग्रामीण) तालुका प्रमुख गजानन मोरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.

तालुका संपर्क प्रमुख राम सावंत म्हणाले, कोरोनाच्या संकटातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक जनहिताचे ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. जनभावना ओळखूनच ते काम करीत आहेत. शिवसैनिकांनी घराघरांत जाऊन जनतेशी संवाद साधत सरकारच्या उपक्रमांची माहिती द्यावी.

यावेळी माधव नगरचे उपसरपंच बाळासाहेब मगदूम, बामणोलीचे माजी सरपंच सावळाराम शिंदकर, नाना शिंदे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. रामदास पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संयोजन शहर प्रमुख सतीश खांबे, सतीश मस्के यांनी केले. पांडुरंग इंगळे यांनी आभार मानले.

Web Title: Let's give Shiv Sena past glory in the district