वाळव्याची ओळख ‘अधिकाऱ्यांचे गाव’ अशी होऊ दे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:31 IST2021-09-05T04:31:16+5:302021-09-05T04:31:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाळवा : वाळव्याचे नाव क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते, तसेच आता अधिकाऱ्यांचे गाव म्हणून स्वतंत्रपणे ओळख निर्माण ...

वाळव्याची ओळख ‘अधिकाऱ्यांचे गाव’ अशी होऊ दे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळवा : वाळव्याचे नाव क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते, तसेच आता अधिकाऱ्यांचे गाव म्हणून स्वतंत्रपणे ओळख निर्माण करा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले.
वाळवा येथील गुरुवर्य लालासाहेब पाटील सार्वजनिक वाचनालय व अकॅडमी इमारतीच्या नूतनीकरण व विस्तारीकरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष व वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप पाटील होते. प्रांताधिकारी खिलारी, उपजिल्हाधिकारी प्रदीप पाटील, उपसभापती नेताजी पाटील, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू, संग्रामसिंह पाटील, राजाराम पाटील, वर्धमान मगदूम, मिलिंद थोरात, किसन गावडे, जयकर गावडे, युवराज सूर्यवंशी, विजयकुमार पाटील उपस्थित होते.
दिलीप पाटील म्हणाले, ६५ लाख रुपये खर्चून हे अद्ययावत वाचनालय इमारत काम पूर्ण करण्यात येईल. खासदार धैर्यशील माने यांनी खासदार फंडातून १५ लाख दिले आहेत. यामध्ये ३०० लोक बसण्याची सोय केली आहे. ४० ते ५० मुलींची अभ्यासिका, ७० मुलांची स्वतंत्र अभ्यासिका सोय केली आहे. याचा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
माणिक पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या हस्ते वाचनालयास दिलेली पुस्तके माणिक पाटील व प्रशांत थोरात यांनी स्वीकारली. धनाजी शिंदे यांनी आभार मानले.