शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

निर्भया पथकाकडून मुलींना स्वसंरक्षणाचे धडे, मिरजेत कराटे कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 13:47 IST

स्त्री सक्षमीकरण कार्यक्रमाअंतर्गत मिरजेतील निर्भया पथकामार्फत येथील बापुजी साळुंखे महाविद्यालयात सुमारे पाचशे शालेय विद्यार्थीनींना कराटे प्रशिक्षणाचे धडे देण्यात आले. या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळाला असून शाळांनी या कार्याचे उत्स्फूर्त स्वागत केले.

ठळक मुद्देनिर्भया पथकाकडून मुलींना स्वसंरक्षणाचे धडेमिरजेत कराटे कार्यशाळा : पाचशे मुलींचा सहभाग

मिरज : स्त्री सक्षमीकरण कार्यक्रमाअंतर्गत मिरजेतील निर्भया पथकामार्फत येथील बापुजी साळुंखे महाविद्यालयात सुमारे पाचशे शालेय विद्यार्थीनींना कराटे प्रशिक्षणाचे धडे देण्यात आले. या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळाला असून शाळांनी या कार्याचे उत्स्फूर्त स्वागत केले.बापुजी साळुंखे महाविद्यालयात झालेल्या या कार्यशाळेस उपविभागीय पोलिस अधिकारी अनिकेत भारती, मिरज शहर पोलिस पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजू ताशिलदार, बापुजी साळुंखे महाविद्यालयाचे प्राचार्य उदयसिंह माने-पाटील आदी उपस्थित होते. आरग येथील प्रशिक्षक कलगोंडा पाटील व त्यांच्या पथकाने मुलींना कराटेचे प्रशिक्षण दिले.

ऐनवेळी येणाऱ्या संकटांना कसे तोंड द्यायचे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी भारती म्हणाले की, छेडछाडीपासून महिलांवरील आत्याचाराच्या अनेक घटना आपण ऐकत असतो. अशा घटना थांबल्या पाहिजेत, रोखता आल्या पाहिजेत, असे अनेकांना वाटत असते, पण वाटणे आणि तशी कृती घडणे यात खुप फरक असतो. त्यामुळेच निर्भया पथकाने हा कृतशील कार्यक्रम हाती घेतला आहे.

शासनामार्फत, पोलिस दलामार्फत आता स्त्री सक्षमीकरणाबरोबरचत्यांना तातडीची मदत मिळावी, त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून अधिक सतर्कता बाळगली जाते. स्त्री संरक्षण हा प्राधान्यक्रम आहे.प्राचार्य माने-पाटील म्हणाले की, पोलिस दलाने घेतलेल्या या उपक्रमाचे आम्हाला कौतुक वाटते. सातत्याने असे उपक्रम झाले तर खऱ्या अर्थाने स्त्री सक्षमीकरणाला बळ मिळेल. ताशिलदार म्हणाले की, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थीनी, महिला या सर्वांप्रती समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे.

छेडछाडीच्या, आत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी विद्यार्थीनींना सक्षम करण्याचा उपक्रम पोलिसांनी हाती घेतला आहे. त्यातूनच अशा कार्यशाळा आणि प्रत्येक शाळा, महाविद्यालयात तक्रारपेटीचा उपक्रम सुरू झाला आहे.

निर्भया पथकाच्या पोलिस उपनिरीक्षक दिपाली गायकवाड म्हणाल्या की, नवरात्रोत्सवात देवीचा जागर करतात त्याप्रमाणे आम्ही या नवरात्रीपासून महिला सक्षमीकरणाचा जागर करीत आहोत. महिला या मनानेच नाही तर शरिरानेही ती सक्षम व्हावी म्हणून आम्ही पाऊल उचलले आहे. निर्भया सखींना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात आले. पथकाचे सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :PoliceपोलिसSangliसांगली