कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण शोधमाेहीम १ जुलैपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:19 IST2021-06-20T04:19:31+5:302021-06-20T04:19:31+5:30
सांगली : महानगरपालिका कार्यक्षेत्रात संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण शोध व नियमित संनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. एक जुलैपासून ...

कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण शोधमाेहीम १ जुलैपासून
सांगली : महानगरपालिका कार्यक्षेत्रात संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण शोध व नियमित संनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. एक जुलैपासून आशा वर्कर्समार्फत हे सर्वेक्षण होणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनी दिली.
महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार आणि उपायुक्त राहुल रोकडे व उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रातील आरोग्य केंद्र स्तरावर हे सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्व्हेअंतर्गत यावर्षी प्रत्येक यूपीएचसीकडून एकूण पंधरा हजार लोकसंख्येचे सर्वेक्षण केले जाणार आहे. प्रत्येक यूपीएचसीकडून पाच आशा वर्कर्समार्फत सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये होणाऱ्या सर्व्हेत महापालिका क्षेत्रात सक्रिय कृष्ठरोग व क्षयरोग रुग्ण किती आहेत याची माहिती घेतली जाणार आहे. यासाठी नागरिकांनी आशा वर्कर्सना माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ. ताटे यांनी केले आहे.