इटकरे परिसरात बिबट्याचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:29 IST2021-01-08T05:29:59+5:302021-01-08T05:29:59+5:30

कामेरी : इटकरे (ता. वाळवा) येथे आशियाई महामार्गास जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर दोन दिवसांपासून नागरिकांना बिबट्याचा वावर आढळून येत आहे. ...

Leopards roam the Itkare area | इटकरे परिसरात बिबट्याचा वावर

इटकरे परिसरात बिबट्याचा वावर

कामेरी : इटकरे (ता. वाळवा) येथे आशियाई महामार्गास जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर दोन दिवसांपासून नागरिकांना बिबट्याचा वावर आढळून येत आहे. सोमवारी परिसरात बिबट्याच्या पावलाचे ठसे आढळल्याने गावांत भीतीचे वातावरण पसरले. वनपाल अमोल शिंदे, वनरक्षक रायन पाटोळे यांनी या ठिकाणचे ठसे घेतले. हे ठसे बिबट्याचे असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला.

इटकरेत गावठाणालगत मुख्य रस्त्यावर संदीप बाबूराव पवार यांचे शेत आहे. त्यामधे गहू पीक आहे. शनिवारी व रात्री बाजीराव नरके हे ट्रॅक्टर घेऊन येत असताना बिबट्या या शेतातून येलूरच्या दिशेने झेपावला. रविवारी सायंकाळी साडे सातवाजता याच ठिकाणी बिबट्या गव्हाच्या शेताकडे गेलेला स्वप्निल भोसले, जगन्नाथ पाटील यांना दिसला. त्यामुळे वनपाल अमोल शिंदे, वनरक्षक रायन पाटोळे व वनमजुरांनी सोमवारी सकाळी या ठिकाणचे ठसे घेतले. हा बिबट्या मध्यमवयीन असावा, असा अंदाज व्यक्त करतानाच ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये. काळजी घ्यावी. रात्री एकटे शेतात पाणी पाजण्यासाठी किंवा अन्य कामासाठी जाऊ नये. गटाने फिरावे. हातात काठी व बॅटरी ठेवावी, असे आवाहन वनपाल शिंदे यांनी केले. इटकरे परिसरात पाझर तलाव, तुकाई डोंगर, महामार्गालगतच्या भागात गेल्या महिन्यापासून बिबट्याचे दर्शन होत आहे. यामुळे भीतीचे वातावरण आहे.

Web Title: Leopards roam the Itkare area