वाकुर्डे खिंडीसह निनाई मंदिर परिसरात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:28 IST2021-09-26T04:28:24+5:302021-09-26T04:28:24+5:30
कोकरूड : शिराळा तालुक्यातील वाकुर्डे खिंडीसह डोंगरावरील निनाई मंदिर परिसरात चारपेक्षा जास्त बिबट्याचे सतत दर्शन होत आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये ...

वाकुर्डे खिंडीसह निनाई मंदिर परिसरात बिबट्याची दहशत
कोकरूड : शिराळा तालुक्यातील वाकुर्डे खिंडीसह डोंगरावरील निनाई मंदिर परिसरात चारपेक्षा जास्त बिबट्याचे सतत दर्शन होत आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
वाकुर्डे बुद्रुक खिंडीतून प्रवास करणाऱ्या शेकडो नागरिकांना सायंकाळी सातनंतर रात्री दहापर्यंतच्या, तसेच दूध वाहतूक करणाऱ्या गाडी चालकांना आटूगडेवाडीपासून बादेवादीपर्यंतच्या डोंगर, खिंड परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी चार बिबटे दिसले. चारचाकी वाहनधारकांना एकाच वेळी दोन बिबटे दिसल्याने नेमके किती बिबटे असावेत. याचा अंदाज येत नाही.
डोंगरावरील निनाई मंदिर परिसरात येळापूरसह मेणी परिसरातील मोठ्या प्रमाणात शेतकरी गुरे चारण्यास, तसेच चारा आणण्यासाठी जातात. अशावेळी अनेकांना बिबटे आढळले आहेत. त्यामुळे येथे किती बिबटे आहेत हेच कळत नाही. सध्या डोंगर, दरी, माथ्यावर दोन फुटांपर्यंत गवत वाढले असून, अनेक वेळा छोटे प्राणी दिसून येत नसल्याने भीती वाढली आहे. येळापूरसह वाकुर्डे खिंड परिसरात चार पेक्षा जास्त बिबटे असल्याने भीती वाढली आहे. वनविभागाने लक्ष्य देण्याची मागणी प्रवासी आणि शेतकरी वर्गातून होत आहे.