वांगी येथे दुचाकीस्वारास बिबट्याचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:30 IST2021-01-08T05:30:02+5:302021-01-08T05:30:02+5:30

वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथे सोमवारी पहाटे तीन वाजता येथील दुचाकीस्वार बबन ईश्वर चव्हाण गावाकडे येत ...

Leopard sighting on a two-wheeler at Wangi | वांगी येथे दुचाकीस्वारास बिबट्याचे दर्शन

वांगी येथे दुचाकीस्वारास बिबट्याचे दर्शन

वांगी :

वांगी (ता. कडेगाव) येथे सोमवारी पहाटे तीन वाजता येथील दुचाकीस्वार बबन ईश्वर चव्हाण गावाकडे येत असताना मसोबाच्या ओढयाजवळ कुत्राच्या मागे लागलेला बिबट्या निदर्शनास आला.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिक व प्रवासात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वांगी येथील बबन चव्हाण सोनहिरा कारखान्याचे कर्मचारी आहेत. ते गावापासून चार किलोमीटवरील हनुमाननगर येथे राहतात. ते सोमवारी पहाटे कारखान्याकडे कामासाठी चालले होते.

गावापासून जवळ असणाऱ्या मसोबाच्या ओढयाच्या पूर्व बाजूने कुत्राच्या पाठीमागे लागलेला बिबट्या सांगली-सातारा रस्त्यावर आला. मात्र, गाडीच्या दिव्यामुळे कुत्रे व बिबट्या पुन्हा रस्त्याच्या पूर्व बाजूकडे गेले. बबन चव्हाण एकटेच गाडीवर होते. बिबट्या सहा फुटावर आल्यामुळे भीतीने त्यांचे हातपाय थरथरत होते. ते कारखान्यावर पोहोचल्यावर ही माहिती त्यांनी घरी दिली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिक भयभीत झाले आहेत.

Web Title: Leopard sighting on a two-wheeler at Wangi