देवराष्ट्रे (जि. सांगली): देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील भरत साळुंखे हे शनिवारी दुपारी ऊस तोडत असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. भरत यांनी चपळाईने हा हल्ला चुकवला. याचवेळी भरत यांच्या दोन पाळीव कुत्र्यांनी बिबट्यावर प्रतिहल्ला केल्यामुळे बिबट्याने व एका पिल्लाने तेथून पलायन केले.
साळुंखे यांच्या शेताजवळच्या झाडीत काही हालचाली जाणवल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता दोन पिल्लांसह बिबट्याचे कुटुंब तेथे होते. बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला
कुत्र्यांचा पिल्लांकडे मोर्चा
१. यावेळी भरत यांच्याबरोबर त्यांनी पाळलेले रॉट व्हिलर व बेल्जियम शेफर्ड जातीची दोन कुत्री होती. या दोन्ही कुत्र्यांनी बिबट्यावर प्रतिहल्ला केला. यामुळे बिबट्याने व त्याच्या एका पिल्लाने घटनेच्या ठिकाणावरून उसाच्या शेतातून पलायन केले
२. बिबट्याची आणखी दोन पिल्ले ओढ्याच्या काठावरील झाडीमध्ये होती. दोन्ही कुत्री पिल्लांच्या दिशेने गेली असता भीतीने ही पिल्ले झाडावर जाऊन बसली. झाडाखाली दोन कुत्री व माणसे जमा झाल्याने तीन तास बिबट्याची पिल्ले झाडावर होती.
३. सागरेश्वर अभयारण्याचे वनक्षेत्रपाल बालाजी चव्हाण व कर्मचारी, वनपाल एस. एस. कुंभार, एस. टी. गवते, वनरक्षक रोहन मेक्षे, एम. एम. मुसळे व अन्य कर्मचाऱ्यांनी बिबट्याच्या पिल्लांची सुटका केली.
Web Summary : In Devrashtre, a leopard attacked a sugarcane cutter, Bharat Salunkhe. His dogs retaliated, forcing the leopard and one cub to flee. Two cubs sought refuge in a tree, later rescued by forest officials.
Web Summary : देवराष्ट्रे में, एक तेंदुए ने गन्ना काटने वाले भरत सालुंखे पर हमला किया। उनके कुत्तों ने जवाबी हमला किया, जिससे तेंदुआ और एक शावक भाग गए। दो शावकों ने पेड़ में शरण ली, जिन्हें बाद में वन अधिकारियों ने बचाया।