सोनवडेत बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:32 IST2021-07-14T04:32:42+5:302021-07-14T04:32:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वारणावती : सोनवडे (ता. शिराळा) येथील वस्तीतील जोतिर्लिंग मंदिराच्या चौकातील कुत्र्यावर बिबट्यासह बछड्याने हल्ला करून कुत्रे ...

Leopard attacks dog in Sonawade | सोनवडेत बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला

सोनवडेत बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

वारणावती : सोनवडे (ता. शिराळा) येथील वस्तीतील जोतिर्लिंग मंदिराच्या चौकातील कुत्र्यावर बिबट्यासह बछड्याने हल्ला करून कुत्रे फस्त केले. आठ दिवसांत ही दुसरी घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील डोंगरकपारीतील वाड्यावस्त्यांवर बिबट्यांची दहशत आहे. गेल्या महिन्यात सोनवडे येथील पवार वस्तीवरील कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला होता. तर मागील आठवड्यात सिद्धार्थनगर येथील कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला होता. रविवारी रात्री दोनच्या सुमारास सोनवडे येथे जोतिर्लिंग मंदिर चौकातील कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून फरफटत ग्रामपंचायतीच्या पाठीमागील उसाच्या शेतात नेऊन कुत्रे फस्त केले. घटनास्थळी बिबट्याचे व त्याच्या पिल्लाच्या पायाचे ठसे उमटले आहेत. तातडीने बिबट्या व बछड्याला पकडून अभयारण्यात सोडावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

Web Title: Leopard attacks dog in Sonawade